अहिल्यानगर : सोशल मीडियावर मैत्री करत व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंगचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सायबर गुन्हेगार महिला व विद्यार्थ्यांना लक्ष्य करत आहेत. त्यातून अनेक तक्रारी सायबरसह अन्य पोलिस ठाण्यांमध्ये दाखल होत आहेत, तसेच फ्रॉड कॉलद्वारे अनेकांची मोठी आर्थिक फसवणूकही होत आहे. गेल्या काही दिवसांत सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचे ४२ गुन्हे झाले दाखल आहेत.