Ahmednagar MIDC Staff : एमआयडीसीतील कामगारांना पगारवाढ; बक्षीस, बोनस, वार्षिक सहल, सुट्ट्यांचाही मिळणार लाभ

वेतनवाढीच्या करारावर कामगार युनियनच्या वतीने पाटील, उनवणे, कामगार प्रतिनिधी आनंद बारस्कर, नितीन उजागरे, युनिट अध्यक्ष एडके ताई यांचे तर कंपनी व्यवस्थापनातर्फे संचालक बिजल शेठ यांनी सह्या केल्या.
Ahmednagar MIDC Staff
Ahmednagar MIDC Staff Sakal
Updated on

Ahmednagar News : अखिल भारतीय कामगार सेना व एमआयडीसी येथील आयकॉन मोल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्यात नुकताच करार झाला. कर्मचाऱ्यांना ७ हजार रुपये पगारवाढ देण्यात आली. त्याचबरोबर बक्षीस, बोनस, वार्षिक सहल, पगारी रजा व सुट्ट्या व कामगार कायद्याप्रमाणे इतर लाभ नवीन करारानुसार मिळणार आहे.

हा करार १ एप्रिलपासून ते ३१ मार्च २०२७पर्यंत तीन वर्षांसाठी करण्यात आला आहे. १५ ते १६ वर्षांपासून करार न झाल्याने मागील काही वर्षांपासून अखिल भारतीय कामगार सेनेच्या वतीने कंपनी व्यवस्थापनाकडे पाठपुरावा सुरू होता.

अखिल भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस राजेश पाटील व जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब उनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कंपनी व्यवस्थापनासह बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या कराराने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

वेतनवाढीच्या करारावर कामगार युनियनच्या वतीने पाटील, उनवणे, कामगार प्रतिनिधी आनंद बारस्कर, नितीन उजागरे, युनिट अध्यक्ष एडके ताई यांचे तर कंपनी व्यवस्थापनातर्फे संचालक बिजल शेठ यांनी सह्या केल्या. यावेळी कामगार संदीप निमसे, नितीन उजागरे, आनंद बारस्कर, अशोक सबीन, संजय नरसाळे, मयूर बारस्कर, शिवाजी दरेकर आदी उपस्थित होते. कंपनीचे बिजल शेठ म्हणाले, कामगार कायद्यांचा लाभदेखील मिळणार आहे. १ एप्रिल २०२३ पासून फरक अदा केली जाणार आहे.

Ahmednagar MIDC Staff
Ahmednagar News : बोगस मालमत्ताधारक रडारवर; जीआयएस सर्व्हेला सुरूवात; २५०० मालमत्तांची मोजदाद पूर्ण

उनवणे म्हणाले की, कंपनीतील कामगारांना महागाईच्या काळात सन्मानाने जगता यावे, यासाठी कंपनी व्यवस्थापनाशी पाठपुरावा करुन त्यांचा वेतनवाढीचा प्रश्‍न मार्गी लावला. यासाठी संघर्षाची वेळ न येता, कंपनीकडूनही मोठे सहकार्य मिळाले. युनिट अध्यक्ष एडके यांनी युनियनच्या पाठपुराव्यामुळे कामगारांना पगारवाढ शक्य झाली. युनियन व कंपनी व्यवस्थापनाचे त्यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com