Sambhaji Nagar : आरटीईच्या यंदाही सहाशे जागा रिक्तच

मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यात येतो
Sambhaji Nagar : आरटीईच्या यंदाही सहाशे जागा रिक्तच
Updated on

छत्रपती संभाजीनगर - आरटीई प्रवेश प्रक्रियेतील सर्व फेऱ्यांची प्रक्रिया ऑगस्ट महिन्यात पूर्ण झाली आहे. परंतु, तरी देखील क्षमतेच्या ४ हजार ६२ पैकी ६०६ जागा रिक्त राहिल्या आहेत. विलंबाने होत असलेल्या प्रक्रियेचा हा परिणाम असल्याचे पालकांनी म्हटले आहे; तर ठराविक शाळांमध्येच पालकांचा प्रवेश हट्ट असल्यानेच जागा रिक्त राहिल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.

मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यात येतो. यंदा शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठीची प्रक्रिया जानेवारीत सुरू करण्यात आली. तर त्याचा प्रवेशाचा ड्रॉ हा मार्चमध्ये काढण्यात आला होता.

Sambhaji Nagar : आरटीईच्या यंदाही सहाशे जागा रिक्तच
Pune News : शेवटच्या श्रावणी सोमवारी पवित्र शिवलिंगावर जल्लाभिषेक करत महापुजा करुण आरती

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण ५४५ शाळा यंदा आरटीई प्रवेशासाठी पात्र ठरल्या असून, त्यांची प्रवेश क्षमता ४ हजार ६२ आहे. त्यापैकी ३ हजार ४५३ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. नियमित चार फेऱ्या आणि चार विशेष फेऱ्यानंतरही ६०६ जागा या रिक्त राहिल्या आहेत.

Sambhaji Nagar : आरटीईच्या यंदाही सहाशे जागा रिक्तच
Solapur : वाहतूक पोलिस दलातील प्रत्येक अंमलदाराला दररोज २० वाहनांवर कारवाई करण्याचे उद्दिष्ट

दरवर्षी आरटीई प्रवेश प्रक्रियेत ठराविक शाळांकडे पालकांचा कल अधिक असतो. अशा काही नामांकित शाळांकडून प्रवेशासाठी पालकांची अडवणूक केली जाते. त्याअनुषंगाने यंदा खबरदारी म्हणून शाळांनी प्रवेशासाठी आडमुठेपणा केल्यास कारवाईचा इशारा शिक्षण विभागाने दिला होता.

Sambhaji Nagar : आरटीईच्या यंदाही सहाशे जागा रिक्तच
Nashik Accident News : भरधाव आयशर ट्रकच्या धडकेत दोघे ठार

त्यामुळे प्रवेश प्रक्रिया नियमानुसार झाल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. तर विद्यार्थ्याचे प्रतिक्षा यादीत नाव असताना प्रवेश प्रक्रियेला विलंब होत असल्याने नाईलाजास्तव पालकांनी इतर शाळांमध्ये मुलांचे प्रवेश घेतल्याचे पालकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.