- राजू नरवडे
संगमनेर - विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर संगमनेर मतदारसंघात थोरात विरुद्ध विखे असा संघर्ष पाहायला मिळण्याचे संकेत होते. मात्र, ऐनवेळी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे मातब्बर नेते, विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात महायुतीकडून पूर्वाश्रमीचे भाजपचे आणि आत्ताचे शिवसेना शिंदे गटाचे अमोल खताळ यांना उमेदवारी देण्यात आली. या दोघांमध्ये मुख्य लढत होणार असली तरी थोरातांचे पारडे जड मानले जात आहे.