Sangamner Crime :बनावट सोने तारण प्रकरणी नऊ जणांविरुध्द गुन्हा

या प्रकरणी शाखाधिकारी सुदाम शेजवळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संगमनेर शहर पोलिस ठाण्यात नऊ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
Gold crime
Gold crime sakal
Updated on

संगमनेर- प्रवरा सहकारी बँकेच्या संगमनेर शाखेत गोल्ड व्हॅल्युअरने आठ कर्जदारांच्या मदतीने ३८ लाख ४४ हजार ४२२ रुपयांना फसविले.

या प्रकरणी शाखाधिकारी सुदाम शेजवळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संगमनेर शहर पोलिस ठाण्यात नऊ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

प्रवरा बँकेच्या संगमनेर शाखेतील सोनेतारण कर्ज प्रकरणातील सोन्याचे मूल्यांकन करण्यासाठी जगदीश शहाणे यांची गोल्ड व्हॅल्युअर म्हणून नियुक्ती केली होती.

Gold crime
Pune Crime : पत्नीला मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा

मागील वर्षभरात त्यांनी आठ कर्जदारांना हाताशी धरुन, सोन्याचे बनावट दागिने तारण ठेवले. संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाने याबाबत कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

त्यानुसार जगदीश शहाणे (एकता चौक, मालदाड रोड), भानुदास ढगे (पिंपळगाव खांड, ता.अकोले), गोरक्ष गाडेकर (मनोली ), सुधीर घुगे (घुलेवाडी), मारुती मंडलिक (रायतेवाडी फाटा), शरद पर्बत (ढोलेवाडी), राहुल गुरकुले (संगमनेर खुर्द ), सुशील रोहम ( निमगाव टेंभी) सह एक महिला अशा नऊ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.