Job Vacancies : संजीवनी नोकरी महोत्सव-२०२४ ऑक्टोबरमध्ये,शंभर कंपन्यांकडून १० हजार जागांसाठी मुलाखती अन् नियुक्तिपत्रे

Job Vacancies : संजीवनी नोकरी महोत्सव-२०२४' मध्ये १०० नामांकित कंपन्यांकडून १०,००० जागांसाठी मुलाखती आणि जागेवर नियुक्तिपत्रे दिली जाणार आहेत. बेरोजगारांसाठी ५ ऑक्टोबरला कोपरगाव येथे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
Sanjivani Job Fair 2024
Sanjivani Job Fair 2024 sakal
Updated on

कोपरगाव : संजीवनी युवा प्रतिष्ठानकडून युवकांच्या सशक्तीकरणासाठी, तालुक्यासह परिसरातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी ‘संजीवनी नोकरी महोत्सव-२०२४’चे येत्या ५ ऑक्टोबरला आयोजन केले आहे. देशातील नामांकित १०० कंपन्यांतील तब्बल १० हजार जागांसाठी तत्काळ मुलाखती व जागेवर नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगारांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत केले.

संत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज भक्त निवासात सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेदरम्यान हा महोत्सव होणार आहे. कोणीही रिकाम्या हाती जाणार नाही, याची काळजी घेतली आहे. ज्यांना नोकरी मिळणार नाही, त्यांना जॉब कार्ड देण्यात येणार असल्याचे कोल्हे म्हणाले.

‘संजीवनी’च्या कार्यस्थळावर ‘संजीवनी नोकरी महोत्सवा’चे संकेतस्थळ व क्यूआर कोडचे उद्‍घाटन करण्यात आले. अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान, किरण रहाणे, दीपक पवार आदी यावेळी उपस्थित होते.

कोल्हे म्हणाले की, तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम नाही. तालुक्यात केवळ १० कंपन्यांनी पीएफचे खाते उघडले आहे. संजीवनी उद्योग वगळता गेल्या पाच वर्षांत तालुक्यात केवळ २०० जणांना रोजगार उपलब्ध झाला. जबाबदार नागरिक म्हणून प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिल्या नोकरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. आयटी, नॉन आयटी, फार्मासह सर्व सेक्टरमधील कंपन्यांचे प्रतिनिधी येणार आहेत.

जॉब कार्डद्वारे बेरोजगारांना कुठे नोकरीची संधी आहे, ते पुढील सहा महिने प्रतिष्ठानतर्फे कळविण्यात येणार आहे. महोत्सवात दिव्यांगांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. महिला, युवक, युवती, बेरोजगारांनी महोत्सवात सहभाग घेऊन भविष्य उज्ज्वल करावे. www.sanjivanijobfair.com या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन कोल्हे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.