राळेगणसिद्धी येथील सौरभ औटी यांची भारतीय लष्करात लेफ्टनंट पदी निवड

राळेगणसिद्धी येथील सौरभ औटी यांची भारतीय लष्करात लेफ्टनंट पदी निवड
Updated on
Summary

आज सौरभची भारतीय लष्करात लेफ्टनंटपदी झालेली निवड ही राळेगणसिद्धीसाठी एक अभिमानास्पद गोष्ट असून यानिमित्ताने गावाचा गौरव वाढला आहे.

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : सैन्यात भरती (Indian army) होऊन देशसेवा करण्याची राळेगणसिद्धी परिवाराला मोठी परंपरा आहे. आज सौरभची भारतीय लष्करात लेफ्टनंटपदी झालेली निवड ही राळेगणसिद्धीसाठी (ralegan siddhi) एक अभिमानास्पद गोष्ट असून यानिमित्ताने गावाचा गौरव वाढला आहे. त्याचा आदर्श इतर मुलांना प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे व्यक्त केले. यावेळी हजारे यांनी लेफ्टनंट सौरभ औटी (saurabh auti) व त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करत कौतुक केले. (saurabh auti from ralegan siddhi has been selected as a lieutenant in the indian army)

राळेगणसिद्धी येथील सौरभ औटी यांची भारतीय लष्करात लेफ्टनंट पदी निवड
राळेगणसिद्धी : महिला शेतकऱ्याची 'कूल' आयडिया, कामगारांसाठी केला 'हा' प्रयोग

नुकतीच राळेगणसिद्धी येथील सौरभ औटी याची भारतीय लष्करात लेफ्टनंट पदावर निवड झाली. त्यानिमित्ताने त्याने जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांची भेट घेत आशीर्वाद व मार्गदर्शन घेतले. यावेळी सौरभचे राळेगणसिद्धी परिवारातील सर्व आजी माजी सैनिकांनी एकत्र येत कौतुक केले. लवकरच जम्मू येथील १६८ व्या तोफखाना रेजिमेंटमध्ये दाखल होणार असल्याची माहिती यावेळी सौरभने हजारे यांना दिली. सौरभ व त्यांच्या कुटुंबीयांसमवेत बोलताना हजारे यांनी देखील त्यांच्या लष्करातील अनेक आठवणींना उजाळा दिला. लष्करात थेट अधिकारी पदावर निवड होणारा सौरभ औटी हा पहिलाच विद्यार्थी आहे. यापूर्वी डॉ. गणेश पोटे व अक्षय उगले या दोघांनी युपीएससी परीक्षेत यश मिळविले असल्याची माहिती सरपंच डॉ. धनंजय पोटे यांनी दिली.

राळेगणसिद्धी येथील सौरभ औटी यांची भारतीय लष्करात लेफ्टनंट पदी निवड
अण्णांच्या उपोषणामुळे राळेगणसिद्धी चिंताग्रस्त

यावेळी सरपंच डॉ. धनंजय पोटे, माजी सरपंच जयसिंग मापारी, मंगल मापारी, लाभेष औटी, मंगल उगले, प्राचार्य दिलीप देशमुख, संजय पठाडे, सुनिल हजारे, दादा पठारे, नानाभाऊ मापारी, दादाभाऊ पठारे, बाळासाहेब मापारी, शंकर पठारे, बाळू पठारे, ज्ञानदेव उगले, नंदकुमार मापारी, दत्तात्रय उगले, यादव औटी, गणपत मापारी, गणपत गावडे, वसंत पठारे, संतोष पठारे, लक्ष्मण मापारी, उत्तम मापारी यांच्यासह गावातील सर्व आजी माजी सैनिक उपस्थित होते.

राळेगणसिद्धी येथील सौरभ औटी यांची भारतीय लष्करात लेफ्टनंट पदी निवड
आदर्श गाव राळेगणसिद्धी लॉकडाउन... सहाजण निघाले पॉझिटिव्ह

शुद्ध आचार, विचार, निष्कलंक जीवन, जीवनात त्याग आणि अपमान सहन करण्याची शक्ती ही पाच तत्त्वे ज्यांच्याजवळ असेल तो समाजात परिवर्तन आणि देशाचा विकास करू शकतो. जन्म आणि मरणाच्यावेळी आपण काही घेऊन येत किंवा काही घेऊन जात नाही, त्यामुळे समाजासाठी जे काही चांगले कार्य करता येईल ते करण्याचा प्रयत्न करत रहा असा सल्लावजा कानमंत्र हजारे यांनी यावेळी लेफ्टनंट सौरभ औटी याला दिला.

राळेगणसिद्धी येथील सौरभ औटी यांची भारतीय लष्करात लेफ्टनंट पदी निवड
राळेगणसिद्धी येथे सौरऊर्जा प्रकल्प लवकरच कार्यान्वित

एनडीएसारख्या संस्थेतून प्रशिक्षण घेतल्यानंतर जीवनातील कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाऊ शकतो. जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे व माझ्या घरातील सदस्य त्यांचे समाज व देशासाठी असलेले काम पाहूनच मलाही देशासाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली. यापुढे तरुणांना लष्करात येण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे.

- लेफ्टनंट सौरभ औटी, राळेगणसिद्धी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.