Ahmednagar : विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ, शाळेच्या नजीक सांडपाणी, उकिरडा : कारेगावातील घटना

Ahmednagar : कारेगावातील न्यू इंग्लिश स्कूल आणि जिल्हा परिषद शाळेजवळ सांडपाणी आणि उकिरड्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तीन महिन्यांपासून समस्या कायम आहे.
Sewage and Garbage Endanger Student Health Near Karegav School
Ahmednagar schoolsakal
Updated on

टाकळीभान : श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथे खासदार गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारात गेल्या तीन महिन्यांपासून गावातील सांडपाणी वाहून येत आहे, तसेच गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतीलगतच ग्रामस्थांनी उकिरडा केल्याने शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. ग्रामपंचायत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.

कारेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल आवारात ग्रामपंचायतीने गावातील सांडपाणी सोडण्यासाठी शोषखड्डे घेतले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून खड्डे भरलेले असून, सध्या पडणाऱ्या पावसामुळे या खड्ड्यातून सांडपाणी वाहत आहे. त्यामुळे येथे दुर्गंधीबरोबरच डास व आजारांना आमंत्रण देणारे घटक वाढले आहेत. परिणामी लगतच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर होऊ शकतो, याचा विसर पडून तीन महिन्यांत कुठलेही पाऊल उचलण्यात आलेले नाही.

दुसरीकडे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतीलगत ग्रामस्थांनी उकिरडा करत त्यात दररोज शेण व कचरा टाकला जातोय. येथे ग्रामस्थ बेजबाबदारपणे गाया व म्हशी बांधत आहेत. त्यामुळे त्यांचे पडणारे शेण, दुर्गंधी व अस्वच्छतेचा परिणाम शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो.

केंद्र शासनाच्या सांडपाणी व्यवस्थापन योजनेसाठी प्रस्ताव‌ पाठवला आहे. त्यासाठी १५ लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे.

-राजेंद्र भालदंड, ग्रामविकास अधिकारी, कारेगाव

सांडपाणी बाजूला काढून देण्याचा प्रयत्न केला असता, प्रताप कापसे यांनी खटला दाखल करण्याची धमकी दिली.

- आनंदा वाघ, सरपंच, कारेगाव.

गेल्या तीन महिन्यांपासून येथे पाणी साचत आहे. दुर्गंधी येत आहे. याची वारंवार ग्रामपंचायतकडे तक्रारही केली आहे.

-पंडित मोरे, मुख्याध्यापक, न्यू इंग्लिश स्कूल, कारेगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.