Nagar South Loksabha: दक्षिण जिंकायचं, तर गोळाबारूद हवा! विखे पाटलांची पॉवर पण समीकरणे बदलली

शंकरराव गडाखांना जरी दक्षिणमधून लोकसभेची उमेदवारी मिळाली, तरी त्यांची हक्काची जी व्होटबँक आहे. त्याचा कोणताही फायदा त्यांना मिळणार नाही.
Nagar South Loksabha
Nagar South Loksabhasakal
Updated on

शंकरराव गडाखांना जरी दक्षिणमधून लोकसभेची उमेदवारी मिळाली, तरी त्यांची हक्काची जी व्होटबँक आहे. त्याचा कोणताही फायदा त्यांना मिळणार नाही. मुळात नेवासे विधानसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघात आहे. दक्षिणमध्ये शिवसेनेची उमेदवारी मिळाली, तरी जिंकण्यासाठी ताकद हवी का नको.

Nagar South Loksabha shankarrao gadakh sujay vikhe patil

राजकीय नेते त्यांच्या अभ्यासानुसार आणि पक्षाच्या ध्येयधोरणानुसार विधान करीत असतात. प्रत्येक नेता आपला पक्ष वाढीसाठी प्रयत्न करीत असतो. त्यामध्ये गैर असे काहीच नाही. एकेकाळी शिवसेनेची (जेव्हा पक्ष एकत्र होता) ताकद होती.

कै. बाळासाहेब विखे पाटील, विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कोपरगावचे माजी आमदार अशोक काळे, पारनेरचे विजय औटी, तसेच नगर शहरात अनिल राठोड आमदार होते. पुढे मंत्रीही झाले.

साखरसम्राटांच्या जिल्ह्यात पक्ष वाढविणे आणि विस्तार करणे तसे सोपे नसते. मात्र, जेव्हा एखादा बडा नेता ज्या कोण्या पक्षात जातो त्या पक्षाची त्या मतदारसंघात ताकद दिसून येते. तेच नेते पुन्हा ज्या पक्षात जातात तेव्हा त्या पक्षाचा झेंडा फडकत असतो. हे नगर सारख्या जिल्ह्यात नेहमीच दिसून आले आहे.

डॉ. विखे पाटलांची पॉवर (who is sujay vikhe patil)

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत हे काल (सोमवारी) शिर्डीत होते. त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी नेवासेचे आमदार शंकरराव गडाख हे योग्य आणि प्रबळ उमेदवार आहेत.

आता ही जागा शिवसेनेच्या वाटेला येईल का हाच मुळात प्रश्‍न आहे. या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे डॉ. सुजय विखे पाटील हे वजनदार नेते आहेत आणि गेल्या पाच वर्षांत त्यांनी मतदारसंघ पिंजून काढताना जी विकासकामे केली आहेत.

ती लोकांना स्पष्टपणे दिसतात. वयोश्री योजना असेल नगरमधील उड्डालपूल असेल किंवा जनसंपर्कासह विविध विकासकामे असतील. ते नेहमीच प्रकाशझोतात असतात. जर त्यांना आव्हान द्यायचे असेल, तर मोठ्या ताकदीने मैदानात उतरावे लागेल. तशी तयारी त्यांचे विरोधक आज तरी करताहेत किंवा तयारी सुरू आहे, असे चित्र काही पाहण्यास मिळत नाही.

या मतदारसंघाकडे एक दृष्टिक्षेप टाकला, तर असे लक्षात येईल की पारनेर, नगर शहर, पाथर्डी-शेवगाव, श्रीगोंदा, कर्जत जामखेड, राहुरी हे सहा विधानसभा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघात येतात. या सहा मतदारसंघात शिवसेनेचा कुठेही आमदार नाही. म्हणावी अशी ताकद नाही. पक्षाचे नेटवर्क असेल, पण सर्वांना बरोबर घेऊन ताकद निर्माण केली आहे, असे नेतृत्व सध्या, तरी शिवसेनेकडे (दोन्ही गट) नाही.

गडाखांना फायदा किती! (who is Shankarrao Gadakh)

राहिला प्रश्‍न शंकरराव गडाख यांचा. ते स्वयंभू नेते आहे. ते शिवसेनेचे सहयोगी सदस्य आहे. म्हणजेच ते ओरिजनल शिवसैनिक आहेत, असे समजण्याचे कारण नाही. त्याहून दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे ती ही की ते ज्या नेवासे मतदारसंघाचे नेतृत्व करतात. तो मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघात आहे.

म्हणजे तेथे शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे आहेत. यदाकदाचित समजा गडाखांना जरी दक्षिणमधून लोकसभेची उमेदवारी मिळाली, तरी त्यांची हक्काची जी व्होटबँक आहे. त्याचा कोणताही फायदा त्यांना मिळणार नाही. उत्तरेत जो पक्षाचा किंवा आघाडीचा उमेदवार असेल त्यांना त्याचा लाभ होईल. हे सर्व पक्षिय गणित जर लक्षात घेतले, तर दक्षिणमध्ये शिवसेनेचा उमेदवार कसा काय निवडून येईल हे राऊत यांनाच माहीत.

समीकरणे बदलली

डाॅ. विखे पाटील हे दक्षिण मतदारसंघाचे नेतृत्व करतात. त्यांचा सध्या तरी झंझावात आहे हे नाकारून चालणार नाही. या मतदारसंघातून आम्हाला लढायचे आहे हे पारनेरचे आमदार नीलेश लंके, जिल्हा परिषदेच्या सदस्या राणी लंके आणि आमदार राम शिंदे वारंवार सांगतात.

येथून त्यांना त्यांच्या पक्षाची उमेदवारी मिळेल का हे यथावकाश कळेलही. आगामी निवडणुकीत कोणती समीकरणे घडतील हे आताच सांगता येणार नाही. मात्र, गेल्या वर्षा-दीड वर्षात राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या.

शिवसेना, राष्ट्रवादीतच दोन गट पडले. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे मोठे गट भाजपबरोबर आहेत. म्हणजेच भाजपची ताकद वाढणार आहे. शिंदे गट येथे उमेदवारीची मागणी करेल याची सुतराम शक्यता नाही.

नीलेश लंके हेही अजित पवारांच्या शब्दाबाहेर जातील, असे वाटत नाही. डॉ. विखे पाटील यांच्या विरोधात लढायचे, तर अजित पवारांचा ग्रीन सिग्नल लागेल की नाही. जर लंकेंना विखे पाटील यांच्याविरोधात लढायचे असेल, तर त्यांनाही वेगळा विचार करावा लागेल. हे जर तरचे प्रश्‍न असले, तरी राजकारणात काहीही होऊ शकते.

एक मात्र खरे की एक एक खासदार निवडून आणणे भाजपसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे सध्या तरी डॉ. विखे पाटील यांचे पारडे जडच दिसते. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेला संधी किती हा प्रश्‍न आहेच. दक्षिण जिंकायचे असेल, तर स्वत:जवळ गोळाबारूद हवा की नको !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.