SEBI : शेअर मार्केट फसवणुकीला लगाम; ‘सेबी’ने गुंतवणूकदारांसाठी केली मार्गदर्शक तत्वे जाहीर

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने हजारो लोकांची फसवणूक होत आहे.
sebi
sebisakal
Updated on

अहमदनगर - शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने हजारो लोकांची फसवणूक होत आहे. शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचे प्रशिक्षण देणारी कोणतीही अधिकृत संस्था नाही. या कमतरतेचा गैरफायदा घेऊन सेमिनार घेऊन फसवणूक होते. फसवणुकीस लगाम लावण्यासाठी ‘सेबी’ ने शेअर मार्केटिंगमधील मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.

वाणिज्य शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमामध्ये शेअर मार्केटबाबत अधिकृत माहिती दिलेली आहे. वाणिज्य शाखेची पदवी घेऊन शेअर मार्केटची माहिती घेणे प्रत्येकाला शक्य नाही. फक्त शेअर मार्केटचे प्रशिक्षण देणारे कोणतेही अभ्यासक्रम विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेमार्फत शिकविले जात नाहीत.

देश आणि राज्य पातळीवर काही नामांकित संस्थांनी शेअर मार्केटिंगचे प्रशिक्षण देणारे खासगी क्लास सुरू केले आहेत. त्यांच्या क्लासमध्ये वाणिज्य शाखेचे पदवीधर किंवा शेअर मार्केटिंगचा अभ्यास असणारे प्रशिक्षक आहेत. त्यांनी अन्य जिल्हे आणि प्रमुख शहरे आणि तालुका पातळीपर्यंत शाखा विस्तार केला आहे. ही शाखा सुरू करणाऱ्यास किमान प्रशिक्षण दिलेले असते. अशा नामांकित क्लासची फी जास्त असते. या क्लासमध्ये जाऊन शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे.

काही जण वेगवेगळ्या शहरांमध्ये मोठे हॉटेल, सभागृहात एकदिवसीय मोफत कार्यशाळा घेतात. या कार्यशाळेला अनेक जण जातात. गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे चित्र तयार केले जाते. आमच्या कंपनीमार्फत गुंतवणूक केल्यास तज्ञ सल्लागार जास्त परतावा मिळेल, अशी गुंतवणूक करण्याचा सल्ला देतील, असे सांगितले जाते. या मायाजालास अनेक जण फसतात.

आयडॉल राकेश झुनझुनवाला

सनदी लेखापाल (सी.ए.) राकेश झुनझुनवाला यांनी शेअर गुंतवणुकीच्या आधारे ४७ हजार कोटींची मालमत्ता निर्माण केली. सेमिनारमध्ये राकेश झुनझुनवाला यांचे हे उदाहरण सांगून गुंतवणूकदारांपुढे आयडॉल निर्माण करतात. झुनझुनवाला यांनी ४७ हजार कोटी कमविले. आपण किमान ४७ कोटी तर कमवू शकतो, असे चित्र निर्माण केले जाते. वास्तविक झुनझुनवाला यांचा वाणिज्य क्षेत्रातील सखोल अभ्यास होता.

जागतिक घडामोडींचा अभ्यास करून ते गुंतवणूक करत होते. त्याकाळात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या फारच कमी होती. आता शेअर मार्केटमध्ये शेअर खरेदी-विक्रीसाठी आवश्यक असणारे डी.मॅट खाते धारकांची संख्या १६ कोटींमध्ये अधिक आहे. गुंतवणूकदारांची संख्या वाढल्याने मक्तेदारी संपली आहे.

सेबीची स्थापना

सेबी ही भारतातील भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था आहे. ता.१२ एप्रिल १९८८ मध्ये स्थापना झालेली आहे. कोणत्याही कंपनीला शेअर (समभाग) माध्यमातून खुल्या बाजारातून भांडवल जमा करायचे असेल तर सेबीच्या कठोर अटी, शर्तींचे पालन करावे लागते. त्यानंतरच शेअरची विक्री करता येते.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतः अभ्यास करणे आवश्‍यक आहे. त्यानंतर शेअर खरेदीसाठी स्वतःचे डिमॅट खाते उघडून स्वतः गुंतवणूक करावी. कोणत्या अनोळखी व्यक्तीचा सल्ल्याने गुंतवणूक करू नये किंवा गुंतवणूक करण्यासाठी दुसऱ्याच्या खात्यावर पैसे दिल्यास शंभर टक्के फसवणूक होते. शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवरील नफा अनेक घटकांवर अवलंबून असतो.

त्यामुळे कोणीही एवढ्या रक्कमेवर नफ्याची खात्री देत असेल तर फसवणूक होण्याचा जास्त धोका आहे. आपल्या डी.मॅट खात्याचा युझर आय.डी आणि पासवर्ड दुसऱ्याला वापरण्यास दिल्याने फसवणूक होते. सेबीने फसवणूक होऊ नये, यासाठी संकेतस्थळ (वेबसाईट) वरून मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केली, त्याचा अभ्यास करावा.

- प्रा. संजय दुधाडे, शेअर मार्केट सल्लागार, अहमदनगर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com