शिर्डी - सलग सात वेळा येथून विधानसभेत जात असलेल्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील विरूध्द माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठबळावर मैदानात उतरलेल्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रभावती घोगरे अशी सरळ सामना होईल, अशी अटकळ बांधली जात होती. प्रत्यक्षात भाजपत बंडखोरी झाली.