शिर्डी : देश तोडणारे सरकार उलथवून टाका ; एच. के. पाटील

एच. के. पाटील यांचे आवाहन; काँग्रेसच्या प्रदेश नवसंकल्प कार्यशाळेस प्रारंभ
एच. के. पाटील
एच. के. पाटील sakal
Updated on

शिर्डी : जातिधर्मांच्या भिंती उभ्या करून गेल्या आठ वर्षांपासून भाजप भारत तोडोचे राजकारण करीत आहे. त्यास भारत जोडोचे उत्तर देत केंद्रातील लोकशाही व जनतेच्या विरोधातील सरकार उलथवून टाकायला हवे, असे मत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीच्या वतीने आयोजित दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळेचे उद्‍घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यभरातून आलेले पक्षाचे पदाधिकारी, आमदार, खासदार व मंत्र्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले, की अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या उदयपूर नवसंकल्प शिबिरातील ठराव व प्रस्तावांची राज्यात काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात येत आहे. ‘एक व्यक्ती, एक पद’ या निर्णयाची अंमलबजावणी राज्यात सुरू झाली. मंत्री थोरात म्हणाले, की काँग्रेसचा विचार समतेच्या विचारावर आधारलेला आहे.

फुले, शाहू, आंबेडकर यांनीही तोच विचार दिला. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा काँग्रेसचा हा विचारच देशाला पुढे घेऊन जाईल. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ‘पुन्हा एकदा काँग्रेस’चा जो नारा दिला आहे, तो प्रत्यक्षात आणण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि देशात व राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आपण आणू. सूत्रसंचालन उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केले.

भाजप सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून लोकशाहीवर आघात करीत आहे. नॅशनल हेरॉल्डप्रकरणी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांना दिलेली ईडीची नोटीस ही देशातील लोकशाहीची चिंता वाढविणारी आहे. देशातील जनता व काँग्रेसजन या दोघांच्या पाठीशी आहेत.

- बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

काँग्रेस पक्षाने सर्वधर्मसमभाव जोपासला. मागासवर्गीय समाजाला मोठी संधी देण्याबरोबरच त्यांच्यासाठी केली जाणारी आर्थिक तरतूद पूर्णतः खर्च व्हावी, अशा सूचना या शिबिरात मांडण्यात आली.

- सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री

महागाईमुळे देशात महामंदी येण्याची भीती आहे. 1990 च्या आर्थिक बदलानंतर टेलिकॉम व इंधन काही उद्योजकांच्या हातात गेले, ही चिंतेची बाब आहे. केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्नभावाची वागणूक मिळते आहे.

- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांच्यावरील कारवाई राजकीय द्वेषातून आणि भाजपच्या किडक्या डोक्यातून केली जात आहे. देशात सध्या हुकूमशाही राजवट सुरू आहे. त्याविरोधात काँग्रेस ठामपणे उभी आहे.

- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()