Ahmednagar Rain News : दारणापाठोपाठ आज गंगापूर धरण ओसंडून वाहू लागले; समन्यायीचे संकट टळणार?

सह्याद्रिच्या घाटमाथ्यावर काल रात्रीपासून पावसाचे जोरदार आगमन झाले. दारणापाठोपाठ आज गंगापूर धरण ओसंडून वाहू लागले. भंडारदरापाठोपाठ निळवंडे धरण ओसंडून वाहू लागले.
shirdi rain update gangapur darna dam overflow jayakwadi dam water storage monsoon rain
shirdi rain update gangapur darna dam overflow jayakwadi dam water storage monsoon rainsakal
Updated on

शिर्डी : सह्याद्रिच्या घाटमाथ्यावर काल रात्रीपासून पावसाचे जोरदार आगमन झाले. दारणापाठोपाठ आज गंगापूर धरण ओसंडून वाहू लागले. भंडारदरापाठोपाठ निळवंडे धरण ओसंडून वाहू लागले. गोदावरी आणि प्रवरा नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. त्यामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ अपेक्षित आहे.

समन्यायी पाणी वाटप कायद्याची टांगती तलवार असलेल्या गोदावरीच्या खोऱ्यातील शेतकऱ्यांचा आशा घाटमाथ्यावरील पावसाच्या कृपेने पल्लवीत झाल्या आहेत. सध्या जायकवाडी धरणात केवळ दहा टक्के पाणीसाठा आहे.

त्यात आणखी चाळीस टीएमसी पाण्याची भर पडणे गरजेचे आहे. तसे झाले तरच गोदावरी, प्रवरा आणि मुळा कालव्यांच्या लाभक्षेत्राला उपलब्ध पाणीसाठ्यातून पुरेसे पाणी मिळू शकेल. निम्मा पावसाळा संपत आला तरी सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पुरेसा पाऊस नसल्याने या तिनही कालव्यांच्या लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

shirdi rain update gangapur darna dam overflow jayakwadi dam water storage monsoon rain
Ahmednagar Rain Update : भंडारदरा परिसरात अतिवृष्टी! घाटघर, रतनवाडी परिसरात हाहाकार; जनजीवन विस्कळीत

मात्र हे निराशजनक चित्र काल रात्रीपासून बदलण्यास सुरवात झाली. प्रमुख धरणे भरली आणि गोदावरी व प्रवरा दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. जायकवाडी धरणाच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर पाणी जाण्यास सुरवात झाल्याने नगर जिल्ह्यातील लाभधारक शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

भंडादऱ्यापाठोपाठ आज सकाळी निळवंडे धरण भरले. आज सायंकाळपासून त्यातून तब्बल ३१ हजार क्युसेक वेगाने पाणी बाहेर सोडण्यात आले. त्यामुळे प्रवरा नदी दुथडी भरून वाहू लागली. तिकडे दारणा पाठोपाठ गंगापूर धरण भरले. या दोन्ही धरणातून अनुक्रमे तेविस आणि साडे सहा हजार क्युसेक वेगाने पाणी बाहेर सोडण्यात आले.

shirdi rain update gangapur darna dam overflow jayakwadi dam water storage monsoon rain
Shirdi Constituency Lok Sabha Election Result : शिवसेना ठाकरे गटाने पेटवली मशाल; जनतेने भाऊसाहेब वाकचौरे यांना दिली दिल्लीत जाण्याची संधी

त्यामुळे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून आज सायंकाळपासून तब्बल ४५ हजार क्युसेक वेगाने पाणी गोदावरी पात्रात पडत होते. त्यामुळे गोदावरी नदी देखील दुथडी भरून वाहू लागली. मुकणे धरणात पन्नास टक्के म्हणजे साडेतीन टीएमसी पाणीसाठा झाला आहे. मुळा धरणात एकोणावीस टीएमसी पाणीसाठा झाला.

तूट भरून निघण्याची आशा

समन्यायी पाणी वाटप कायद्याची टांगती तलवार दूर होण्यासाठी जायकवाडीत आणखी चाळीस टीएमसी पाणीसाठा होणे गरजेचे आहे. तथापि गोदावरी व प्रवरा या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने तूट भरून निघेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.