Rajesh Tope : पाय ओढणे हा पक्षाला जुना रोग : राजेश टोपे

‘पक्ष दुभंगला, याचा आता विचार न करता प्रत्येकाला सहकार्य करून पुढे जाण्याची गरज आहे. कारण, एकमेकांचे पाय ओढणे हा आपल्या पक्षाला जुना रोग आहे’.
rajesh tope
rajesh topesakal
Updated on

शिर्डी - ‘पक्ष दुभंगला, याचा आता विचार न करता प्रत्येकाला सहकार्य करून पुढे जाण्याची गरज आहे. कारण, एकमेकांचे पाय ओढणे हा आपल्या पक्षाला जुना रोग आहे,’ अशी खंत माजी मंत्री राजेश टोपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) शिबिरात बोलून दाखवली.

ज्येष्ठ नेते शरद पवार हाच आपला आश्वासक चेहरा असून, प्रत्येकाने एकमेकाला सहकार्य करून पक्षासाठी काम करण्याचे आवाहन टोपे यांनी केले.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अनिल देशमुख, खासदार सुप्रिया सुळे, फौजिया खान, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार अमोल कोल्हे, आमदार एकनाथ खडसे, रोहिणी खडसे आदी पक्षाचे नेते शिबिरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत आहेत.

टोपे पुढे म्हणाले की, पक्षाला आज निष्ठावान कार्यकर्त्यांची गरज असून, पुरोगामी विचारधारेसाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे. शरद पवार ही व्यक्ती नाही, तर विचारधारा असून, ते आपल्या पक्षाचा आश्वासक चेहरा आहेत. भाजपने दोन पक्ष फोडले आणि आपल्या पक्षातील नेते त्याला बळी पडले, हे दुर्दैव आहे.

शरद पवारांचा पुन्हा झंझावात दिसेल : पाटील

‘भाजपने खोटी आश्वासने देऊन लोकांना फसवण्याचे काम केले. आता दुसऱ्या पक्षाचे आमदार फोडण्याचा उद्योग सुरू आहे. लोकप्रतिनिधींवर दबाव आणला जातो, हे सर्व लोकांना माहिती आहे. सर्वांना आपल्यासोबत घेऊन सरकार आणता येईल, असे त्यांना वाटते. परंतु शरद पवार यांचा झंझावात कायम आहे, तो या निवडणुकीतही दिसेल’, असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.