Shirdi-Sainagar Express: शिर्डी-साईनगर एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना निकृष्ट दर्जाचं जेवण ! कंत्राटदाराला ५ लाखांचा दंड

मुंबई ते साईनगर शिर्डीदरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर रेल्वेने त्याची गंभीर दखल घेतली आहे.
Shirdi-Sainagar Express: शिर्डी-साईनगर एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना निकृष्ट दर्जाचं जेवण ! कंत्राटदाराला ५ लाखांचा दंड
Updated on

Mumbai-Shirdi Sainagar Express: मुंबई ते साईनगर शिर्डीदरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर रेल्वेने त्याची गंभीर दखल घेतली आहे.

मेल-एक्स्प्रेस गाड्यांत खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या कंत्राटदारांसाठीच्या दंडाच्या नियमांत बदल करण्यात आल्याचे पत्र जारी केले आहे. त्यानुसार दोषी कंत्राटदारांना पाच लाख रुपयांपर्यंत कमाल दंड होणार आहे. आतापर्यंत दंडाची जास्तीत जास्त रक्कम २५ हजार रुपये होती.

वेगवान आणि आरामदायी प्रवासासाठी भारतीय रेल्वेने देशभरात ‘वंदे भारत’ गाड्या सुरू केल्या आहेत. या गाडीसह इतर मेल-एक्स्प्रेसमधील प्रवाशांना खानपान सेवा पुरवण्याची जबाबदारी ‘इंडियन केटरिंग ॲण्ड टुरिझम कॉर्पोरेशन’ची (आयआरसीटीसी) आहे; परंतु गेल्या काही दिवसांपासून सीएसएमटी ते साईनगर शिर्डी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मध्ये देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा चांगला नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. (Latest Marathi News )

एक्स्प्रेसमधील खानपानाच्या डब्यात उंदीर आणि झुरळे फिरत असल्याचे प्रवाशांनी काढलेले अनेक व्हिडिओही व्हायरल झाले होते. त्यासंदर्भात ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केले होते. रेल्वेने त्याची गंभीर दखल घेतली असून दंडाच्या नियमांत बदल केल्याचे जाहीर केले आहे. (Latest Marathi News )

Shirdi-Sainagar Express: शिर्डी-साईनगर एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना निकृष्ट दर्जाचं जेवण ! कंत्राटदाराला ५ लाखांचा दंड
Rajasthan Election: भाजपकडून एकही मुस्लिम उमेदवार नाही; उलट काँग्रेसच्या उमेदवारांविरोधात वापरली ही स्ट्रॅटजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.