शिवसेनेचं गडाखांना नगरचे पालकमंत्री करायचं चाललंय

shankarrao gadakh
shankarrao gadakh
Updated on

नेवासे : राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या उपस्थितीत सोनईत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा ‘शिवसंवाद’ मेळावा झाला. यावेळी उपस्थितीत सर्वच पदाधिकाऱ्यांचा ‘मंत्री शंकरराव गडाख यांना नगर जिल्ह्याचे पालकमंत्री करा,’ असा सूर होता.

या मागणीचा धागा पकडत कोरगावकर व कृषिमंत्री भुसे यांच्या भाषणातील सूचक वक्तव्यानंतर पदाधिकाऱ्यांनी ‘शिवसेना स्टाईल’ने घोषणा देत प्रतिसाद दिला. तब्बल वर्षभरानंतर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी शिवसंवाद मेळाव्यानिमित्त एकत्र आल्याने त्यांच्यात मोठे उत्साहाचे वातावरण होते. (Shiv Sena plans to make Shankarrao Gadakh the Guardian Minister)

shankarrao gadakh
हटके ः एकरात कमावतो १५ लाख, फक्त फोन घ्यायला चार कर्मचारी!

तालुक्यातील घोडेगाव उपबाजार आवारातील व्यापारी गाळ्यांचे उद्‍घाटन आज (ता. २८) भुसे यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्ताने नगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व शहरप्रमुखांच्या 'शिवसंवाद' मेळाव्याचे सोनईत आयोजन करण्यात आले होते. त्यात अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत मंत्री गडाख यांना जिल्ह्याचे पालकमंत्री करा, अशी मागणी केली होती.

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मागणीचा धागा पकडत मंत्री दादा भुसे म्हणाले, "काही गोष्टी इथे बोलण्यापेक्षा आम्हाला मंत्रालय पातळीवर बोलावे लागणार आहेत आणि काही गोष्टी पाहिजे तर मुख्यमंत्र्यांच्या पण कानावर घालावे लागणार आहे. पालकमंत्री यांनी पण हे लक्षात घेतले पाहिजे की हे महाविकास आघाडीचे सरकार आहे आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख मोठा भाऊ म्हणून काम करत आहेत. आणि त्या पद्धतीची वागणूक त्यांनी या आमच्या नगर जिल्ह्याच्या शिवसेनेलासुद्धा त्या ठिकाणी दिली पाहिजे.

मुख्यमंत्र्यांच्या नक्की कानावर घालू

हा विषय मुद्देसूदपणे आधी त्यांच्या (राष्ट्रवादी) पक्षाच्या नेते मंडळीच्या कानावर घालू. गरज पडली तर मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कानावर पदाधिकाऱ्यांच्या भावना घालू. निश्चितपणे आपल्या परंतु तुमच्या मनात जे काय आहे ते पण होतंय का ते पण आपण पाहू असे सूचक वक्तव्य ही त्यांनी केले.

भाऊ कोरगावकर म्हणाले, "शिवसैनिकांच्या त्यांच्या खूप काही मागण्या नसतात. महाविकास आघाडी म्हटल्यानंतर कधी कधी तोंड दाबून बुक्क्याचा मार पण सहन करावा लागतो. पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्रीपदाबाबत केलेल्या मागणी आपण निश्चितच पक्षप्रमुखांपर्यंत नेऊ.

मला ठाकरेंनी आधार दिला

शंकरराव गडाख म्हणाले, " अनेक नेत्यांच्या बरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. अनेक जणांचा अनुभव घेऊन मी आता इथे शिवसेनेत आलो आहे. पण मला तुम्हाला एकच सांगायचंय की शिवसेनेला उद्धव ठाकरेंचे नेतृत्व भेटले. ते नेतृत्व मी कुठलेही पक्षामध्ये बघितले नाही. गेल्या पाच वर्षात मला एका पक्षाने प्रचंड त्रास दिला. परंतु उद्धव ठाकरेंनी मला जो आधार दिला, धीर दिला, मला मदत केली.

ते करीत असताना अनेक घडामोडी झाल्या. मात्र, मी त्याच वेळेस मनोमन ठरवलं होतं की माझ्यावरती कितीही दबाव टाकला गेला तरी उद्धव ठाकरेंना मी सोडणार नाही. त्यांनीदेखील मनाचा मोठेपणा दाखवला सगळ्या अडचणी असताना मला मंत्री पदावर बसवलं. त्यांच्यासह शिवसैनिकांच्या अपेक्षा मी निश्चितच कामातून पूर्ण करणार आहे.

आता प्रत्येक महिन्यात 'शिवसंवाद'

शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांकडे जनतेचे असलेले विविध प्रश्न सोडवण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात महिन्यातून एकदा शिवसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर, मंत्री शंकरराव गडाख यांनी यावेळी सांगितले. दरम्यान आपणही या मेळाव्यासाठी येत जाऊ असे मंत्री भुसे यांनी जाहीर केले. (Shiv Sena plans to make Shankarrao Gadakh the Guardian Minister)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.