विधान परिषदेच्या तयारीला मिठाईची गोडी; डिसेंबरमध्ये निवडणूक शक्य

Shivaji Kardile
Shivaji Kardile Sakal
Updated on

अहमदनगर : विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून जिल्ह्यातील काही नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली असली, तरी भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले वगळता उघडउघड अद्याप कोणी वाच्यता केली नाही. कर्डिले यांनी मात्र दिवाळीचा मुहूर्त साधत जिल्ह्यातील विधान परिषदेचे मतदार, मान्यवरांपर्यंत मिठाई पोचविली आहे. त्यानिमित्ताने अप्रत्यक्षरीत्या मतदारांचे मत अजमाविण्यात आल्याचे सांगितले जाते.

भाजपकडे विधान परिषदेसाठी कर्डिले वगळता अद्याप तरी दुसऱ्या कोणत्याही तगड्या उमेदवाराचे नाव चर्चेत नाही. भाजपकडूनच कर्डिले यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता असली, तरी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भूमिकेवरच गणिते अवलंबून आहेत. मागील एका कार्यक्रमात खासदार विखे यांनी कर्डिले पुन्हा आमदार होणार, असे म्हटले होते. पुढील वर्षभरात जिल्ह्यात बाजार समित्या, नगरपालिका, सेवा संस्था, ग्रामपंचायती आदी निवडणुकांचा धुरळा आहे. कर्डिले यांचा दक्षिणेत पूर्वीपासूनच चांगला संपर्क आहे. उत्तरेतही राहुरीचे आमदार असताना चांगला संपर्क झाला आहे. त्यामुळे भाजपला त्यांचा फायदा होणार आहे. अशा परिस्थितीत कर्डिले यांना भाजपकडूनच उमेदवारी दिली जाईल, असे राजकीय वर्तुळातून संकेत आहेत. भाजपने अद्याप तरी इतर कोणत्याही नेत्याचे नाव विधान परिषदेसाठी पुढे केलेले नाही. भाजपकडून कर्डिले यांना उमेदवारी न मिळाल्यास ऐन वेळी ते राष्ट्रवादीचा पर्याय निवडू शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

मिठाई मतदारांपर्यंत पोच

गेल्या दोन दिवसांपासून कर्डिले यांनी एकाच वेळी सर्व मतदारांपर्यंत पोचण्याचा मार्ग शोधला. जिल्ह्यातील सर्वच नेते, विधान परिषदेचे मतदार, विविध क्षेत्रांतील मान्यवरांना त्यांनी मिठाई घरपोच देत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने मतदारांकडूनही त्यांच्या उमेदवारीबाबत अप्रत्यक्ष चर्चा होऊन, ही एक प्रकारची राजकीय चाचपणी समजली जाते. विधान परिषदेचे मतदार असलेले महापालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, नगरपालिकांचे सदस्य आदींपर्यंत मिठाई पोच झाल्याचे सांगण्यात येते.

Shivaji Kardile
नगरचे पालकमंत्रीपद अजित पवार यांना द्यावे ; ऊसतोड संघटनेची मागणी

असे आहे वर्चस्व

- महाविकास आघाडी : जिल्हा परिषद, संगमनेर नगरपालिका, राहुरी नगरपरिषद, नेवासे नगरपंचायत, नगर महापालिका
- भाजप : जिल्हा परिषद, शिर्डी, राहाता नगरपंचायत, देवळाली प्रवरा नगरपालिका, कोपरगाव नगरपालिका, श्रीरामपूर नगरपालिका, पाथर्डी नगरपंचायत

आकडे बोलतात..

विधान परिषदेचे एकूण मतदार 398 (सध्या पात्र 396)
नगर 80, राहाता 45, संगमनेर 42, राहुरी 49, श्रीरामपूर 41, कोपरगाव 37, श्रीगोंदे 28, नेवासे 27, पाथर्डी 25, अकोले 6, पारनेर 6, शेवगाव 5, कर्जत 4, जामखेड 3.

Shivaji Kardile
प्रवाशांना यंदाही आरक्षण करूनच करावा लागतोय रेल्वे प्रवास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.