Rain : शिवार, विहिरी तुडुंब; जूनमध्येच ४०० मिलिमीटर पाऊस

कधीच वेळेवर न येणारा पाऊस जूनमध्येच इतका बरसला की, आता शेतांना वाफसाही होईना आणि विहिरी देखील 'ओव्हरफ्लो' झाल्या आहेत.
Well Water Full
Well Water Fullsakal
Updated on

सिद्धटेक - अवर्षण प्रवण भाग असल्याने आधीच कमी प्रमाणात आणि त्यातही कधीच वेळेवर न येणारा पाऊस जूनमध्येच इतका बरसला की, आता शेतांना वाफसाही होईना आणि विहिरी देखील 'ओव्हरफ्लो' झाल्या आहेत. दरम्यान, शेतात वाफसास्थिती नसल्याने आता काही काळासाठी पाऊस येऊ नये, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करू लागले आहेत. दोन महिन्यांपूर्वी दुष्काळी परिस्थिती आणि आता सर्वत्र पाणीच पाणी, अशी अवस्था असल्याने हा हवामान बदलाचा परिणाम असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे.

भौगोलिक परिस्थितीनुसार कर्जत तालुका हा अवर्षण प्रवण आहे. त्यामुळे इतर ठिकाणी सात जूनच्या आसपास हजेरी लावणारा मान्सून भीमाकाठावर ४०० मिलिमीटरपर्यंत बरसल्याने आता शेतशिवार संतुप्त झाले आहे. ओढे-नाले खळाळून वाहू लागले असून, शेताला वाफसा नसल्याने शेतकरीही विसावला आहे.

दरम्यान, मागील उन्हाळ्यात अतिशय खडतरपणे काढलेले दोन महिने शेतकरी विसरलेला नाही. हिरव्यागार पिकांची पाण्याअभावी झालेली होरपळ शेतकऱ्यांना अस्वस्थ करणारी ठरली. उजनी धरण असूनही त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही.

‘पर्जन्यछायेचा प्रदेश’ शिक्का पुसणार का?

पर्जन्यछायेचा प्रदेश असल्याने सर्वत्र जूनमध्ये येणारा पाऊस कर्जत तालुक्यात जुलैपासून सुरू व्हायचा आणि त्याची सरासरीदेखील १०० मिलिमीटरपर्यंत असायची. आता ती वाढली असून सुमारे अडीचपट पाऊस या पावसाळ्यातील जूनअखेर झाला आहे. त्यामुळे पुढील काळात समाधानकारक पाऊस होऊन ''पर्जन्यछायेचा प्रदेश'' हा निसर्गानेच लावलेला शिक्का पुसला जाईल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गाला आहे.

पावसाचा उच्चांक

एखाद दुसरा पाऊस होणाऱ्या जून महिन्यातच तालुक्यात २७५ मिलिमीटर इतका म्हणजेच सुमारे दोनशे टक्के जास्त पाऊस झाला. जवळपास दहा ते बारा वर्षांनंतर जून महिन्यात झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे.

सद्य परिस्थितीत शेती ही आधीपेक्षा जास्तीत जास्त हवामान आधारित झाली आहे. प्रतिकूल हवामानाचा सर्वाधिक फटका शेतीला बसतो. त्यामुळे कृषी विभागात सध्या हवामान बदलांबाबत चर्चासत्रे सुरू आहेत.

- पद्मनाभ म्हस्के, तालुका कृषी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.