CM Eknath Shinde : श्रीगोंद्यात ५३२ कोटींच्या रस्त्यांचे आज भूमिपूजन : शिंदे, फडणवीस, पवार, विखे, लंके यांची उपस्थिती

CM Eknath Shinde : श्रीगोंद्यात ५३२ कोटी रुपयांच्या रस्त्यांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आभासी प्रणालीद्वारे होणार असून, कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उपस्थिती असेल.
Shrigonda 532 crores road projects
CM Eknath shinde, Devendra Fadnavis, Ajit pawarsakal
Updated on

श्रीगोंदे : महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पांतर्गत तालुक्यातील ५३१ कोटी ९३ लाखांच्या तीन रस्त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.११) शहरातील जोधपूर मारुती चौकात आभासी प्रणालीद्वारे भूमिपूजन होणार असल्याची माहिती भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांनी दिली.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार नीलेश लंके यांची उपस्थिती राहणार आहे. अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण असतील. आशियाई विकास बॅंक सहाय्यित प्रकल्प ‘महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पांतर्गत’ तालुक्यातील पेडगाव, श्रीगोंदे रस्ता प्रजिमा-६२, काष्टी, श्रीगोंदे, देऊळगाव, मांडवगण रस्ता प्रजिमा-६३ या ३६४ कोटी १८ लाख रुपयांच्या, तर कोळगाव, सुरोडी, वडाळी मार्गे श्रीगोंदा पेडगाव रस्ता प्रजिमा-६२ या १६७ कोटी ७५ लाख रुपयांच्या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला असून, या रस्त्याचे भूमिपूजन शिंदे यांच्या हस्ते आभासी प्रणालीद्वारे होणार आहे.

या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार बबनराव पाचपुते यांच्या वतीने भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांनी केले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, उपअभियंता विजय होके, माजी सरपंच दत्तात्रय डांगे, सचिन चौधरी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.