Ganpati viserjan : श्रीरामपुरात अडीच हजार गणेश मूर्तींचे संकलन, आरोग्य विभागाचा पुढाकार : कृत्रिम कुंडांची निर्मिती

Ganpati viserjan :श्रीरामपुर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या पुढाकाराने यंदा २,५९१ गणेश मूर्तींचे संकलन करून शिरसगाव तलावात विसर्जन करण्यात आले. कृत्रिम कुंडांची निर्मिती करून पर्यावरणपूरक व्यवस्थापनाची काळजी घेण्यात आली.
Ganpati viserjan
Ganpati viserjan sakal
Updated on

श्रीरामपूर : यंदा पालिकेने अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश मूर्ती विसर्जनाच्या केलेल्या नियोजनामुळे उत्सव निर्विघ्न पार पडला. दोन हजार ५९१ गणेश मूर्तींचे संकलन करण्यात येवून त्यांचे शिरसाव तलावात विधिवत विसर्जन करण्यात आले.

पालिकेच्या वतीने अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जनासाठी व निर्माल्य संकलनासाठी नॉर्दन ब्रँच, दहावा ओटा, अक्षय कॉर्नर, काळाराम मंदिर कॅनॉल जवळ, सरस्वती कॉलनी, गोंधवणी रस्ता कॅनॉल, दळवी वस्ती, खबडी जवळील कॅनॉल पूल, महानुभाव आश्रम पुलाजवळ, कांदा मार्केट (कृत्रिम तलाव) आदी ठिकाणी बॅरेकेडिंग, लाईट व्यवस्था करण्यात आली होती. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.