Shrirampur Crime : बायकोबद्दल वाईटसाईट बोलल्याच्या रागातून चॉपरने वार करून तरुणाची हत्या

आपापसांतील वादातून दोघांनी तरुणाची चॉपरने वार करून हत्या केली.
Tanvir Shah
Tanvir Shahsakal
Updated on

श्रीरामपूर - गोंधवणी रस्त्याजवळील दत्तमंदिर परिसरात आपापसांतील वादातून दोघांनी तन्वीर शाह या तरुणाची चॉपरने वार करून हत्या केली. आज (ता. ९) पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत. मृत तरुणावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

बाबजी शिंदे (पूर्ण नाव माहीत नाही) व सुनील देवकर अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी साजिद छोटू शहा याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की गुरुवारी (ता. ८) रात्री तन्वीर याचा फोन आला. त्याने सांगितले, की बाबजी शिंदे व सुनील देवकर यांनी शिवीगाळ केली, तसेच बायकोबद्दल वाईटसाईट का बोलला याचा राग धरत देवकर याने तन्वीरला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर मतीन शहा याने भांडण मिटविल्याचे तन्वीरने सांगितले.

Tanvir Shah
Ajit Pawar : प्रो-कबड्डीत अजित पवार करणार यूपीचा बचाव; बचावपटू म्हणून झाली निवड

तन्वीरचा फोन झाल्यानंतर मी लगेचच मालेगावहून श्रीरामपूरला येण्यासाठी निघालो. दरम्यान, माझा मित्र तेजस मोरे याने फोन करून, देवकर व शिंदे यांचे तन्वीरसोबत पाण्याच्या टाकीजवळ भांडण झाले असून, त्यांनी तन्वीरला चॉपरने मारल्याचे सांगितले. त्यानंतर लगेच उद्देश मंडलिक याचा मला फोन आला. त्यानेदेखील तन्वीर हा गंभीर जखमी असून, त्याला साखर कामगार रूग्णालयात उपचाराकरता दाखल केल्याचे सांगितले.

Tanvir Shah
Eleventh Admission : अकरावी अ‍ॅडमिशन, नो टेन्शन; तब्बल २० हजार ९०० जागा रिक्त

थोड्याच वेळात भाऊ समीर याने फोन करून कळविले, की तन्वीरला लोणी येथे प्रवरा रुग्णालयात उपचारांसाठी घेऊन जात आहोत. मात्र, लोणीत पोचल्यानंतर तन्वीर याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे समजले. याप्रकरणी शहर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर आरोपी पसार झाले. दरम्यान, ते तिघेही एकमेकांचे मित्र होते. काल (ता. ८) ते सोबत होते, एका अंत्यविधीलाही त्यांनी हजेरी लावण्याची माहिती पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.