लाखेफळ गावाने वेशीवरच कोरोनाला रोखले

कोरोना
कोरोना
Updated on

शेवगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागातील गावे, वाड्या- वस्त्यादेखील कवेत घेतल्या. अनेकांचा उपचारादरम्यान बळी गेला. मात्र, तालुक्यातील जायकवाडी धरणानजीक असलेल्या धरणग्रस्त लाखेफळ ग्रामपंचायतीने कोरोनाची पहिली व दुसरी लाट वेशीबाहेरच रोखण्यात यश मिळविले. गावात एकही रुग्ण सापडला नाही. आता ग्रामस्थ तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी उपाययोजना करीत आहेत.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतर शहराबरोबरच ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवरही बाधित आढळू लागले. त्यामुळे तालुका व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. तालुक्याचा ११४ गावे व ९५ ग्रामपंचायती, असा मोठा विस्तार आहे. कोरोनाची लाट रोखण्यासाठी आरोग्य विभागासह ग्रामपंचायतीची जबाबदारी वाढली होती. (So far no corona patient has been found in Lakhephal village)

कोरोना
शेजाऱ्याने शेतरस्ता अडवला असेल तर साधा अर्ज करील काम तमाम

फेब्रुवारीपासून बाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने प्रशासनाने ग्रामपंचायतींना उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने लाखेफळ, दहिगावशे, जुनी खामपिंप्री, गायकवाड जळगाव, बाडगव्हाण या ग्रामपंचायतींनी स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना करून कोरोनाला वेशीबाहेर रोखण्यात यश मिळविले.

ग्रामपंचायतीने लोकसहभागातून नियमित स्वच्छता, औषधफवारणी, पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा, बाहेरून आलेल्या व्यक्तींचे विलगीकरण आदी उपायांचे काटेकोरपणे पालन केले. हातावर पोट असलेल्यांना किराणा साहित्याचे वाटप केले. आरोग्य विभागाने प्रत्येक कुटुंबाची तपासणी केली. लक्षणे असलेल्यांना विलगीकरणात ठेवून उपचार करण्यात आले. त्यामुळे शेजारील गावांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना, दोन्ही लाटांत लाखेफळमध्ये ती शून्यच राहिली.

शुद्ध हवा, पाण्याने आरोग्य अबाधित

ग्रामपंचायतीने मागील सात वर्षांपासून गावात विविध देशी वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करून जतन केले. त्यामुळे कोरोना संसर्गात ग्रामस्थांना शुद्ध हवा व पाणी मिळाल्याने त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम दिसून आला.

ग्रामस्थांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडणे, सामाजिक अंतर राखणे, वैयक्तिक स्वच्छता ठेवणे, लक्षणे दिसताच तपासणी करणे आदी नियमांचे काटेकोर पालन करीत प्रशासनास सहकार्य केले. त्यामुळे गाव कोरोनामुक्त राहिले.

- शरद सोनवणे, सरपंच, लाखेफळ

(So far no corona patient has been found in Lakhephal village)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.