श्रीगोंदे : गॅसवाहिनीचा रस्ता ‘गॅस’वरच

श्रीगोंदे नगरपालिकेची खास बैठक निर्णयाविनाच
 गॅस पाईपलाईन
गॅस पाईपलाईनSAKAL
Updated on

श्रीगोंदे : गॅसवाहिनीसाठी बाह्यवळण रस्ता खोदण्याकरिता नगरपालिकेने संबंधितांकडून साडेसात कोटी रुपये भरपाई म्हणून घेतले आहेत. त्यासाठी पालिका सभागृहाची मंजुरी गरजेची असल्याचे सांगितले गेले. नगरसेवकांची सोमवारची बैठकही निर्णयाविनाच संपली. गॅसवाहिनीसाठी बाह्यवळण रस्ता खोदण्यास विरोध झाल्याचे सांगण्यात आले.

लिंपणगाव, श्रीगोंदे, अहमदनगर, शिर्डी, औरंगाबाद, मनमाड असा प्रवास असणाऱ्या गॅसवाहिनी प्रकल्पाला श्रीगोंदे शहरात गेल्या वर्षभरापासून ग्रहण लागलेले आहे. शहरातून जाणारी ही वाहिनी अडविली आहे. पालिका व्यवस्थापनाने त्यावर निर्णय घेताना, वाहिनीला रस्ता देण्याचे मान्य करीत त्यापोटी रस्ता खोदाई नुकसान भरपाई साडेसात कोटी रुपये जमा करून घेतले आहेत. दरम्यान, पैसे जमा झाल्यानंतर सुमारे दोन महिन्यांतही त्याबाबत निर्णय होत नसल्याने, पालिका मुख्याधिकारी मंगेश देवरे यांना थेट मंत्रालयातून विचारणा झाली. त्यावर पालिका सभागृहात मंजुरी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेवकांची तातडीची बैठक बोलाविण्यात आली. मात्र, बैठकीत अनेक नगरसेवकांनी गॅसवाहिनीसाठी बाह्यवळण रस्ता खोदण्यास विरोध केला.

दरम्यान, दुरुस्तीसाठी साडेसात कोटी रुपये आले असले, तरी बाह्यवळण रस्त्याच्या मध्यभागी ही वाहिनी धोकादायक ठरू शकते, असा मतप्रवाह काही नगरसेवकांचा आहे. त्यामुळे या बैठकीत निर्णय न होता गॅसवाहिनीचे अधिकारी व नगरसेवक यांची संयुक्त बैठक घेऊन त्यानंतर निर्णय करण्याचे ठरल्याचे सत्ताधारी नगरसेवक मनोहर पोटे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

बाह्यवळण रस्ता हे शहरातील एक उत्तम काम आहे. त्या कामावर माझ्यासह आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांचे लक्ष होते. आता तोच रस्ता खोदण्याचा निर्णय योग्य वाटत नाही. गॅसवाहिनीसाठी बाहेरून खोदाई करावी.

- बाबासाहेब भोस, उपाध्यक्ष, नागवडे सहकारी साखर कारखाना.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()