अहमदनगर : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शाळेचा गणवेश मिळणार आहे. तसेच, पाठ्यपुस्तकांचीही भेट हाती पडणार आहे. गुरुजींना विद्यार्थ्यांच्या ड्रेसवरून आलेला ट्रेस यामुळे कमी होणार आहे. शासनाने देऊ दिलेला गणवेश नंतर देण्याचे ठरल्याने मुख्याध्यापकांचा जीव भांड्यात पडला आहे.
तब्बल ४ कोटी ७९ लाख ४ हजारांचे गणवेश आहेत, तर १८ लाख ५६ हजार ७१३ पुस्तके आहेत. जिल्ह्यातील अनुदानित शाळा गुरुवारी (ता. १५) सुरू होणार आहेत. जिल्हा परिषदेने नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.
या मुलांचे स्वागत केले जाणार आहे. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतून शिकणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविली जातात. तसेच, सर्व मुली, अनुसूचित जाती-जमातींची मुले, दारिद्र्यरेषेखालील सर्व संवर्गातील मुलांना मोफत गणवेश दिले जातात.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश मिळण्यासाठी सर्व तालुक्यांना पी.एफ.एम.एस. प्रणालीद्वारे निधी वर्ग केला आहे. शाळा व्यवस्थापन समितीने ठरविलेला गणवेश विद्यार्थ्यांच्या हाती पडेल.
८ जून रोजीच्या शासन निर्णयानुसार ठरवून दिलेला दुसरा गणवेश निधी प्राप्त झाल्यानंतर दिला जाणार आहे. या गणवेशामुळे मुख्याध्यापक टेन्शनमध्ये आले होते, परंतु त्यांचा घोर काहीसा कमी होणार आहे.
जिल्ह्यातील विद्यार्थिसंख्या
जिल्ह्यात १ लाख १३ हजार २५९ मुली आहेत. अनुसूचित जातींची १६ हजार ५७९ मुले आहेत. अनुसूचित जमातींच्या मुलांची संख्या १९ हजार २०७ आहे. दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थी १० हजार ६६५ आहेत. अशी एकूण १ लाख ५९ हजार ६८० विद्यार्थिसंख्या आहे. त्यांच्या गणवेशासाठी ३०० रुपयांप्रमाणे ४ कोटी ७९ लाख ४ हजार रुपये झेडपीने शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर वर्ग केले आहेत.
पुस्तकेही पहिल्याच दिवशी
समग्र शिक्षाअंतर्गत सर्व शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, अंशतः अनुदानित शाळेतील सर्व मुलांसाठी मोफत पाठ्यपुस्तके पुरविली जातात. जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची ४ लाख ५२ हजार ८७९ विद्यार्थिसंख्या आहे. त्यांना १८ लाख ५६ हजार ७१३ पुस्तके पुरवली आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी (१५ जून) ती त्यांच्या हाती पडतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.