Success Story: खारेमुरे विकणारा गजानन झाला वकील! खाण्याची भ्रांत असलेल्याची प्रेरणादायी संघर्ष

Maharashtra News: आज सर्वांना चकित करणाऱ्या यशाला गवसणी घालण्यात गजानन यशस्वी झाला.
Success Story: खारेमुरे विकणारा गजानन झाला वकील! खाण्याची भ्रांत असलेल्याची  प्रेरणादायी संघर्ष
Updated on

AhamadNagar: लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले. घरी अठराविश्वे दारिद्र्य, शेतीवाडी तर सोडाच, दोन वेळच्या भाकरीची रोजचीच भ्रांत. ना कोणाचा आधार, ना कोणाची मदत. खेळण्या-बागडण्याच्या वयातच समोर आलेल्या खडतर आणि कठीण परिस्थितीपुढे हार न मानता, न लाजता, जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर खारेमुरे विकणारा राशीनमधील गजानन माकोडे वकील झाला.

त्याच्या संघर्षाची कहाणी जशी डोळ्यात पाणी आणणारी आहे, तशी ती अनेकांकरीता प्रेरणादायी आहे. वडील गेल्याने कुटुंबाची जबाबदारी गजानन आणि आई नंदा या दोघांवर आली. वडिलांचा खारेमुरे विकण्याचा व्यवसाय माय-लेकरांनी अथक मेहनतीतून पुढे चालू ठेवला. एरवी खारेमुरे आणि उन्हाळ्यात लिंबू सरबत विकून माय-लेकरांची जगण्याची लढाई मोठ्या नेटाने सुरू होती. अशा कठीण काळात गजाननने कोणतीही कुरबूर न करता, आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेत आपले शिक्षण सुरूच ठेवले. शाळा सुटली की गावात खारेमुरे, चणे विकायचे.

त्यातून मिळणाऱ्या कमाईतून त्यांच्या कुटुंबाचा गाडा सुरू होता. गजानन शाळेत जायचा, त्यावेळी त्याची आई खारेमुरे, लिंबू सरबताची गाड्यावरून विक्री करायची.

कुटुंब चालविण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागत होती. मात्र, ज्यांच्या पावचीलाच संघर्ष पुजलाय, ते या परिस्थितीपुढे हार कशी मानणार. या माय-लेकराने १९ वर्षे तुटपुंजी कमाई, आर्थिक चणचण, गरिबी याविषयी कसलीही कुरकूर न करता आव्हानात्मक परिस्थितीशी मोठ्या कौशल्याने जुळवून घेतले. त्यामुळेच आज सर्वांना चकित करणाऱ्या यशाला गवसणी घालण्यात गजानन यशस्वी झाला.

२०१४ साली एमए पूर्ण केल्यावर वकील होण्यासारखा दुसरा पर्याय नव्हता.हे ओळखून २०१९ मध्ये बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये एलएलबीला प्रवेश घेतला अन् शिक्षण पूर्ण केले.

राशीनकरांना कौतुक

वकील झाल्याची बातमी जशी राशीनकरांना समजली तशी प्रत्येकाच्या तोंडात एकच वाक्य होतं ''खारेमुरे विकणारा आपला गज्या वकील झालायं..! तो वकील झाल्याचे कौतुक जसे राशीनकरांना आहे. त्यापेक्षा कित्येक पटीचे समाधान त्याच्या आईला आहे. गजाननच्या या प्रेरणादायी यशाबद्दल राशीनसह परिसरातून त्याचे कौतुक होत आहे.

परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि बिघडवतही नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि बिघडवतो. वडिलांचा व्यवसाय करून आज वकील झालो हा माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षण आहे.

- ॲड. गजानन माकोडे, राशीन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.