Ahmednagar Power Outage : विजेचा लपंडाव अन् नेटवर्क गुल! अनियमित वीजपुरवठ्याचा श्रीगोंदेत बसतोय फटका

वादळ झाल्यानंतर काही गावे कित्येक दिवस अंधारात राहिल्याचे प्रकार घडले आहेत.
Ahmednagar Power Outage
Ahmednagar Power OutageSakal
Updated on

- समीरण बा. नागवडे

श्रीगोंदे शहर : गेल्या काही महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने सगळ्यांनाच मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरातील वीजपुरवठा वारंवार व तासनतास खंडित होत असल्याने नेटवर्कही गुल होत असून त्याचा शहरवासियांसह व्यावसायिक, विद्यार्थी सर्वांनाच  त्याचा फटका  बसत आहे.

तालुक्यात भारनियमनाच्या व्यतिरिक्तही  विजेचा  लंपडाव  सुरू आहे. मागील काही महिने उन्हाळ्यात विजेच्या अतिरिक्त मागणीमुळे वीजपुरवठा अनियमित होत असे. तर आता पावसाळ्यात रोहित्र नादुरुस्त होणे,  विजेचे खांब पडणे, वीजवाहक तारा तुटणे आदींमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत.

त्यातच महावितरणकडे कर्मचाऱ्यांची वाणवा असल्याने दुरुस्तीसाठीही गरजेपेक्षा अधिक वेळ जातो. शिवाय, दुरुस्तीच्या  कामांसाठी ग्रामस्थांनाच वर्गणी गोळा करावी लागत असल्याचे चित्र आहे.  शिवाय,  अक्षय प्रकाशच्या वीजपुरवठ्याबाबतही अनेक तक्रारी आहेत.  वादळ झाल्यानंतर काही गावे कित्येक दिवस अंधारात राहिल्याचे प्रकार घडले आहेत. 

 यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे सध्या शेती पंपांचा भार काहीसा कमी आहे. परंतु, पुढील काळात शेतीसाठी विजेची मागणी वाढणार आहे. त्यावेळी  शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीजपुरवठा होणे गरजेचे आहे.

 महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी अनेकदा त्यांच्या नेमणुकीच्या जागी नसतात. याबाबत विचारणा केली तर संबंधित व्यक्ती हे कामानिमित्त फिरतीवर गेल्याचे नेहमीच शासकीय उत्तर मिळते. परिणामी, दुरुस्ती अथवा इतर कामांमध्ये अनेक अडचणी येतात.

वीज व नेटवर्क या दोन्ही गोष्टी जीवनात अतिशय महत्वपूर्ण बनल्या आहेत. श्रीगोंद्यात  अनियमित वीजपुरवठा व खराब नेटवर्क यामुळे नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या दोन्ही समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी समान्यांकडून होत आहे.

शासकीय कार्यालयांतही कामाचा खोळंबा

नेटवर्क हे मुख्यत्वे विजेवर अवलंबून असल्याने अनियमित वीजपुरवठ्यामुळे नेटवर्क गुल होण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. शहरासह ग्रामीण भागात नागरिकांना खराब मोबाईल नेटवर्कचा सामना करावा लागत आहे.

एकीकडे मोबाईलचे नेटवर्क गुल होत आहेच, शिवाय वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर ब्रॉडबँड नेटवर्क देखील बंद पडत असल्याने ऑनलाईन कामे ठप्प होत आहेत. सध्या शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत, तिथे वीजपुरवठा आणि नेटवर्कच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्याचबरोबर शासकीय कार्यालये, खासगी दुकाने, व्यवसायांचीही कामेही बंद पडत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.