Sujay Vikhe : १२० च्या स्पीडने आलोय

डॉ. सुजय विखे हस्ते दिव्यांगांना विविध साहित्याचे वाटप
sujay vikhe
sujay vikhe sakal
Updated on

पाथर्डी - कल्याण- निर्मल राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा झाली होती, तेव्हा मी हेलिकॉप्टरने फिरतो अशी टीका करण्यात आली. मात्र, आज १२० च्या स्पीडने रस्त्यावरून आलो आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले. विजय लॉन्स येथे तालुक्यातील आठशे दिव्यांगांना विविध साहित्यवाटपचा कार्यक्रम झाला.

त्यावेळी ते बोलत होते. आमदार मोनिका राजळे, अभय आव्हाड, माणिक खेडकर, अजय रक्ताटे, बंडूशेठ बोरुडे, अमोल गर्जे, प्रतीक खेडकर, धनंजय बडे, रमेश गोरे, अशोक चोरमले, अशोक मंत्री, बाबा राजगुरू, अजय भंडारी, संजय बडे, सुनीता दौंड आदी उपस्थित होते.

sujay vikhe
Ahmednagar : स्कूल मॅपिंग न केल्यास पगार रोखणार; गळतीने गुरुजींना अतिरिक्तची भीती

विखे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. जी- २० परिषदेमुळे देशाची प्रतिमा जगात उंचावली आहे. खेड्यापाड्यांतील दिव्यांग स्वतःसाठी साहित्य खरेदी करू शकत नाहीत, याची जाण मोदींना असल्याने हे साहित्य मी देऊ शकलो.

sujay vikhe
Solapur News : बारामतीचा संघ ठरला मोहोळच्या दहीहंडीचा मानकरी मुंबईचा महिला संघ तृतीय

या साहित्यामुळे दिव्यांगांचे आयुष्य आणखी पाच वर्षे वाढले तर समाधान वाटेल. जिल्ह्यातील ४५ हजार ज्येष्ठ नागरिक व आठ हजार दिव्यांगांना विविध साहित्य देण्यात आले आहे. जाहिरात व शोबाजी मला आवडत नाही, तर काम करणे आवडते. देशातील पहिल्या दहा खासदारांमध्ये माझी निवड झाली.

sujay vikhe
Beed News : नवे बीड ‘अस्वच्छ अन् बकाल’ मोकाट जनावरांसोबत आता कुत्र्यांचाही मुक्त संचार नगरपरिषदेचा ‘ढिसाळ’ कारभार

कल्याण- निर्मलचे काम करताना काहींची अतिक्रमणे काढावी लागल्याने काही जण नाराज झाले. विकासकामे करताना कोणी नाराज झाले तर मला त्याचे काही वाटत नाही. तुमचे कोणतेही प्रश्न असले तरीही मी व आमदार मोनिका राजळे ते सोडवू. देशाला मोदी यांची पुढील काळातही गरज असल्याने, येणाऱ्या निवडणुकीत त्यांनाच निवडून द्या.

ठाकरेंची मतदारांशी गद्दारी

उद्धव ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी व मुलाला मंत्रिपद मिळावे, यासाठी मतदारांशी गद्दारी केल्याची टीकाही विखे यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.