Pink Guava Farming : तैवान पिंक पेरू शेती शेतकऱ्यांसाठी आधार; ८३ रुपये किलो, 3 तोड्यांत पाच लाखांचे उत्पन्न

आंबीखालसा येथील सय्यद बंधूंनी तीन वर्षांपूर्वी एक एकर क्षेत्रात तैवान पिंक पेरूची लागवड केली
taiwan pink guava farming 83 rupees per kg income of five lakhs agriculture
taiwan pink guava farming 83 rupees per kg income of five lakhs agriculture sakal
Updated on

राजू नरवडे

घारगाव : संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा येथील आयुब, रमजान व मुस्ताक सय्यद या तीन बंधुंनी एक एकर क्षेत्रात केलेल्या तैवान पिंक पेरूची शेती त्यांच्यासाठी आधार ठरली आहे. सध्या प्रतिकिलोस ८३ रुपयांचा भाव मिळत असून अवघ्या तीन तोड्यांत पाच लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे.

आंबीखालसा येथील सय्यद बंधूंनी तीन वर्षांपूर्वी एक एकर क्षेत्रात तैवान पिंक पेरूची लागवड केली होती. त्यानंतर आठ ते नऊ महिन्यांनी पेरूची तोड सुरू झाले. पहिल्या वर्षी चार ते पाच टन माल निघाला होता. त्यावेळी पाच लाख रुपयांच्या आसपास पैसे झाले होते. दुसऱ्याही वर्षी चांगला भाव मिळाला. मात्र, झाडांना पेरू कमी लागले होते.

परंतु, यावर्षी प्रत्येक झाडास जवळपास दीडशे पेरू लागले आहेत. सध्या पेरूंची तोडणी सुरू झाली असून प्रतिकिलोस ८३ रुपयांचा भाव मिळत आहे. तीन तोड्यांतच पाच लाख रुपये झाले. अजून दहा टक्के माल सुद्धा गेला नाही. आणखी वीस टन माल निघेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर पेरूंच्या झाडांची छाटणी, खते-औषधे, मजुरी असा एकूण साडेचार लाख रुपयांच्या आसपास खर्च केला.

तिन्ही बंधूंनी पेरूच्या बागेची चांगली देखभाल केल्याने झाडेही अतिशय चांगली झाली आहेत. विशेष म्हणजे सय्यद बंधू स्वतः पेरू विकण्यासाठी थेट मुंबईला घेऊन जातात. सध्या त्यांची ही पेरूची बाग पाहण्यासाठी अनेक शेतकरी भेट देत आहेत.

जून महिन्यात एक एकर क्षेत्रात आठ बाय चारमध्ये १ हजार ३२९ तैवान पिंक पेरूच्या रोपांची लागवड केली. पेरूचा चांगला आकार व्हावा म्हणून फळांना फम लावले असून त्यावर प्लास्टिक पिशवी घातली. त्यामुळे आज पेरूचा चांगला आकार झाला असून पेरूंना चमकही चांगली आहे. त्यामुळे मार्केटमध्ये या पेरूला चांगली मागणी असून प्रतिकिलोस ८३ रुपयांचा भाव मिळत आहे.

-रमजान सय्यद, पेरूउत्पादक-आंबीखालसा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.