Talathi Bharti Result: तलाठी परीक्षेची निवड यादी जाहीर, पण 'या' १३ जिल्ह्यांचा निकाल मात्र रखडला

भूमिअभिलेख विभागाने पंचायत विस्तार अनुसूचित क्षेत्र कायदा, १९९६ (पेसा) अंतर्गत असलेले ते १३ जिल्हे वगळून अन्य २३ जिल्ह्यांसाठी ही यादी जाहीर केली आहे.
Talathi Bharti Result: तलाठी परीक्षेची निवड यादी जाहीर, पण 'या' १३ जिल्ह्यांचा निकाल मात्र रखडला
Updated on

Ahmednagar Talathi Bharti Result: बहुप्रतीक्षित तलाठी परीक्षेची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. भूमिअभिलेख विभागाने पंचायत विस्तार अनुसूचित क्षेत्र कायदा, १९९६ (पेसा) अंतर्गत असलेले ते १३ जिल्हे वगळून अन्य २३ जिल्ह्यांसाठी ही यादी जाहीर केली आहे. संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी संकेतस्थळावर निवड झालेल्या उमेदवारांना यादी पाहता येणार आहे.

राज्यातील ४ हजार ६४४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. टी. सी. एस. कंपनीची परीक्षेसाठी निवड करण्यात आली. या तलाठी पदाच्या परीक्षेसाठी राज्यभरातून १० लाख ४१ हजार ७१३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली होती. १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत तीन टप्प्यांत या परीक्षा ५७ सत्रांमध्ये घेण्यात आल्या होत्या.

तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी ता. ६ जानेवारी २०२४ रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यात १३ आदिवासी बहुल जिल्ह्यांमधील पेसाअंतर्गत रिक्त जागांबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने हे जिल्हे वगळून अन्य २३ जिल्ह्यांमधील निवड यादीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.(Latest Marathi News)

निवड यादी अर्थात यशस्वी उमेदवारांची यादी जिल्हानिहाय तयार करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतरच या १३ जिल्ह्यांमधील उमेदवारांच्या निवड प्रक्रियेची कार्यवाही करण्यात येणार आहे.

Talathi Bharti Result: तलाठी परीक्षेची निवड यादी जाहीर, पण 'या' १३ जिल्ह्यांचा निकाल मात्र रखडला
Fighter Twitter Review: असा अनुभव होणे नाही! हृतिक-दीपिकाचा 'फायटर' नेटकऱ्यांना कसा वाटला?

सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील (पेसा कायदा) १७ संवर्गातील सरळसेवा पदभरतीसंदर्भात विशेष याचिका न्यायप्रविष्ठ आहे. या याचिकेच्या निर्णयास अधिन राहून निवड व प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे. राज्याच्या प्रभारी राज्य परीक्षा समन्वय सरिता नरके यांनी कळविले आहे. (Latest Marathi News)

‘पेसा’मध्ये अहमदनगर जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याचा निकाल जाहीर झालेला नाही. वरिष्ठ पातळीवर यावर निर्णय झाल्यानंतर निकाल जाहीर होणार आहे- राजेंद्रकुमार पाटील, निवासी जिल्हाधिकारी, जिल्हा समन्वयक, तलाठी परीक्षा.

Talathi Bharti Result: तलाठी परीक्षेची निवड यादी जाहीर, पण 'या' १३ जिल्ह्यांचा निकाल मात्र रखडला
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर चालकाला डुलकी लागल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.