भाडेकरूनेच रचला घरमालकाच्या अपहरणाचा कट

tenant kidnapped the landlord
tenant kidnapped the landlordesakal
Updated on

जामखेड (जि. अहमदनगर) : भाडेकरूने दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी मध्यरात्री घरात घुसून घरमालकाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जामखेड पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले. याप्रकरणी एकूण तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरमालक कृष्णा अशोक साळुंके (वय २३), हा बुधवारी (ता. १८) बीड रस्त्यावरील आपल्या राहत्या घरात झोपला असताना, मध्यरात्री एकच्या सुमारास अज्ञात दोन व्यक्तींनी दरवाजा वाजवला. साळुंके याच्या खोलीत दीड वर्षापासून भाड्याने राहणारा आरोपी योगेश शहादेव शिंदे याने गेटचा दरवाजा उघडला. आलेल्या दोघांनी साळुंकेच्या घरात जाऊन, त्याचे हात-पाय बांधून, तोंडाला रुमाल बांधून व गळ्याला चाकू लावून, चारचाकी वाहनात (एमएच 12 एफके 3897) मागच्या सीटवर बसवून म्हणाले, की दहा लाख रुपये दिले नाही तर मारून टाकू. यातून आपली सुटका करून घेत साळुंके याने आरडाओरडा केला. मात्र, तरीदेखील आरोपी योगेश शिंदेने दम दिला. तू गाडीत येऊन बस, नाही तर तुझ्या आईला आम्ही ठार मारू. यादरम्यान आरडाओरडा ऐकून शेजारी राहणारे लोक धावत आले. त्यामुळे आरोपी योगेश शिंदे (रा. सौताडा, ता. पाटोदा, जि. बीड) व त्याचे दोन साथीदार घटनास्थळाहून पळून गेले.

tenant kidnapped the landlord
शरद पवारांमुळेच मराठवाडा विद्यापीठ नामांतर - छगन भुजबळ

पोलिसांच्या दक्षतेमुळे अल्पावधीत आरोपी गजाआड

याप्रकरणी कृष्णा साळुंकेने दिलेल्या फिर्यादीवरून एकूण तीन जणांविरोधात विरोधात जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, जामखेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत दोन आरोपींना, नागेश शाळेच्या पाठीमागील भागातील एका घरातून अटक केली. ही कामगिरी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, निरीक्षक सुनील बडे, पोलिस उपनिरीक्षक राजू थोरात, अविनाश ढेरे, पोलिस कॉन्स्टेबल संग्राम जाधव, आबासाहेब आवारे, अरुण पवार, संदीप राऊत, संदीप आजबे, विजय कोळी, हनुमान आरसूल, महिला पोलिस मनीषा दहिरे यांनी केली.

tenant kidnapped the landlord
कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याची बदली; अवघा गाव झाला भावूक!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.