महापालिकेच्या पथकाने जिल्हा परिषदेत येऊन कारवाईची मोहीम राबविली.
अहमदनगर : जिल्हा परिषदेतील (zilla parishad) कामकाज शंभर टक्के सुरू झाल्यापासून गर्दी (crowd) वाढलेली आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. याची दखल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतली असून, त्यांनी याबाबत महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांच्याशी चर्चा करून कारवाईचे अधिकार जिल्हा परिषदेला देण्याची विनंती केलेली आहे. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने जिल्हा परिषदेत येऊन कारवाईची मोहीम राबविली. (the crowd has increased since the 100 per cent commencement of work in ahmednagar zilla parishad)
जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागात विकासकामे केली जात आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागात जिल्हा परिषदेने विनामास्क फिरणाऱ्यांवर व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी अधिनियम दुरुस्ती करून उपविधी तयार केलेली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत हद्दीत दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे; परंतु जिल्हा परिषदेची इमारत महापालिका हद्दीत असल्यामुळे त्यांना अशी कारवाई करता येत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी व कारवाई करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अधिकार मिळावा, यासाठी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर महापालिकेच्या पथकाने जिल्हा परिषदेत जाऊन कारवाई मोहीम राबविली.
जिल्हा परिषदेत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला मिळावेत, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी व माझी चर्चा झालेली आहे. त्यांच्याकडून पत्र आल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल.
- शंकर गोरे, आयुक्त, महापालिका
जिल्हा परिषदेची इमारत महापालिकेच्या हद्दीत असल्यामुळे कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. ही कारवाई जिल्हा परिषद प्रशासनाला करता यावी, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी व महापालिकेचे आयुक्त यांची चर्चा झालेली आहे.
- वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन
(the crowd has increased since the 100 per cent commencement of work in ahmednagar zilla parishad)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.