आरोग्यासाठी आयुर्वेद अंगीकारण्याची गरज; भगतसिंह कोश्‍यारी

लोणीत आयुर्वेद महाविद्यालय, विखे पाटील रिसर्च फाउंडेशनचे उद्‍घाटन
भगतसिंह कोश्‍यारी
भगतसिंह कोश्‍यारीsakal media
Updated on

लोणी : आजार समूळ नष्ट करण्याची आयुर्वेदात ताकद आहे. आधुनिक युगात मनुष्य पुन्हा जुन्या गोष्टींकडे आकर्षित होत आहे. मानवी आरोग्यासाठी योगाभ्यासाबरोबरच आयुर्वेदाची जोड देणे गरजेचे आहे. उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेदाचा अंगीकार केला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

प्रवरा मेडिकल ट्रस्ट व प्रवरा अभिमत विद्यापीठाच्या प्रवरा ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन व डॉ. बाळासाहेब विखे पाटील रिसर्च फाउंडेशनचा उद्‍घाटन सोहळा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते आज (बुधवारी) करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, विश्वस्त सुवर्णा विखे पाटील, विश्वस्त मोनिका सावंत-इनामदार, कुलगुरू डॉ. विष्णू मगरे उपस्थित होते.

कोश्यारी म्हणाले, की कोविड महामारीत आयुर्वेदाचे महत्त्व सर्वांनाच समजले आहे. आज आरोग्य क्षेत्राने आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने प्रगती केली आहे. असे असतानाही परंपरागत आयुर्वेदाकडे आपण वळत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुर्वेदाला चालना देण्यासाठी स्वतंत्र आयुष मंत्रालयाची स्थापना केली आहे. गोरगरिबांना स्वस्तात औषधे मिळण्यासाठी जनऔषधी योजना सुरू केली आहे.

(स्व.) बाळासाहेब विखे पाटील यांनी घडविलेल्या या संस्थेमध्ये गरीब आणि दुर्गम भागातील जनसामान्यांच्या आरोग्य सेवेचे उत्तम कार्य सुरू आहे. आयुर्वेदाला चालना देण्यासाठी प्रवरेत स्वतंत्र आयुर्वेद महाविद्यालयाची सुरवात होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करत, कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या कामाचे कोश्यारी यांनी कौतुक केले.

कुलपती डॉ. विखे पाटील यांनी प्रारंभी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. प्रास्ताविक डॉ. विष्णू मगरे यांनी केले, तर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

‘प्रवरे’चा देशात नावलौकिक

चंद्रकांत पाटील म्हणाले, की ‘प्रवरे’ने कामातून देशात नावलौकिक मिळवला आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी प्रवरेत शिक्षण व आरोग्यसेवेचा पाया रचला व विस्तारही केला. कुलपती डॉ. विखे हे काम अधिक पुढे घेऊन जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.