दिलासादायक! राहाता तालुक्यात रुग्णसंख्येत घट; लसीकरणातही आघाडी

दिलासादायक! राहाता तालुक्यात रुग्णसंख्येत घट; लसीकरणातही आघाडी
Updated on
Summary

लसीकरणाने पासष्ट हजाराचा टप्पा ओलांडला. हार्ड इम्युनिटीकडे पावले पडू लागलीत. तालुक्याच्या दृष्टीने हि गुडन्युज आहे.

शिर्डी (अहमदनगर) : कोविड (Covid) प्रकोपाचा तीन महिन्यांचा काळाकुट्ट काळ आता इतिहास जमा होतोय. परिचितांच्या मृत्युने (Died) खेड्यापाड्यांना बसणारे हादरे आता कमी होऊ लागलेत. राहाता तालुक्यातील पंच्याहत्तर टक्के गावातून कोविडने गाशा गुंडाळायला सुरवात केलीय. संसर्ग फैलाव दर तीन टक्क्यांवर घसरला आहे. लसीकरणाने पासष्ट हजाराचा टप्पा ओलांडला. हार्ड इम्युनिटीकडे पावले पडू लागलीत. तालुक्याच्या दृष्टीने हि गुडन्युज आहे. (the number of corona patients is declining in rahata taluka)

दिलासादायक! राहाता तालुक्यात रुग्णसंख्येत घट; लसीकरणातही आघाडी
शिर्डी दर्शनाला नेऊन बलात्कार नंतर लग्नास नकार; प्रियकराला अटक

खासगी कोविड सेंटर ओस पडलीत. लाट भरत असताना दररोज तिनशेहून अधिक बाधित असायचे. गुरुवारी पंधराशे चाचण्या झाल्या तर केवळ चौसष्ट बाधित होते. सोळा गावात एकही नवा रूग्ण नव्हता. एकतीस गावातील रूग्णसंख्या एक आकडी आहे. एकसष्ट पैकी सत्तेचाळीस गावातून कोविड गाशा गुंडाळायतोय. राहाता शहरात गेल्या नऊ दिवसात दररोज सरासरी दिडशे चाचण्या झाल्या, केवळ दोन रूग्ण आढळले. शिर्डीची परिस्थितीही याहून वेगळी नाही. लसीकरणाने पासष्ट हजाराचा टप्पा ओलांडला. पहिला डोस 47 हजार तर दुसरा डोस अठरा हजार जणांनी घेतला.

दिलासादायक! राहाता तालुक्यात रुग्णसंख्येत घट; लसीकरणातही आघाडी
शिर्डी विमानतळावरून प्रवाशांसह कार्गो वाहतुकीस ग्रीन सिग्नल

दुस-या लाटेत कोविड रूग्णांच्या सरकारी संख्या वीस हजारावर गेली. जाणकारांच्या सांगण्यानुसार, लक्षणे नसलेल्या रूग्णांची संख्या 80 टक्के आहे. एक कोरोना बाधित किमान पाच ते दहा जणांना बाधित करू शकतो. हे सरकारी गृहितक लक्षात घेतले तर घरीच बरे होणा-यांची आणि लक्षणे नसल्याने आपोआप बरे झालेल्यांची संख्या 80 हजारापर्यत जाऊ शकते. त्यात लसिकरण झालेल्यांची संख्या गृहित धरली तर तालुक्यातील जवळपास सव्वा ते दिड लाख लोकांमध्ये प्रतिकारशक्ती तयार झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका अर्थाने तालुक्याची हि हार्ड इम्युनिटीच्या (सामुहिक प्रतिकारशक्ती) दिशेने वाटचाल सुरू झालीय.

दिलासादायक! राहाता तालुक्यात रुग्णसंख्येत घट; लसीकरणातही आघाडी
शिर्डी संस्थान ‘राष्ट्रवादी’कडे, पंढरपूर काँग्रेसला?

यावेऴी आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राहाता तालुक्यात कोविडची लाट झपाट्याने ओसरतेय. तिस-या लाटेला तोंड देण्याची तयारी वेगाने सुरू आहे. तालुक्याने लसीकरणात आघाडी घेतलीय, राज्यात सर्वाधिक वेगाने आम्ही लसीकरण पूर्ण करणार आहोत. हे उत्तम टिमवर्कचे फलीत आहे. प्रत्येक गावात खबदारी घेतली जातेय.

प्रांताधिकारी गोविंद शिंदे म्हणाले, लस घेतली त्यांनीच घरची कामे करण्यासाठी घराबाहेर पडावे, असा आग्रह धरला जाणार आहे. सरकारी आरोग्य यंत्रणेने मोठी मेहनत घेतल्याने कोविडचा प्रकोप कमी झाला. तथापी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.