वटकणावरून तुटलेली लग्नगाठ पोलिसदादांमुळे झाली घट्ट!

लग्न सोहळा
लग्न सोहळा
Updated on

कर्जत : तिचे आणि त्याचे लग्न जमले. लग्न सोहळा ठरल्या दिवशी पार पडला. मात्र मानपान, रुसवेफुगवे टोकाला गेले. त्यामुळे जीवनसाथीनेच समजून घेतले नाही, तर नात्याला अर्थ काय उरतो, अशी भूमिका घेत नववधूने सासरी जाण्यास नकार दिला. मात्र खाकीने गावातील प्रतिष्ठातांना बरोबर घेत तुटलेली नाती पुन्हा जोडली. दोन दिवसांच्या ताणतणावाच्या जागी आनंद भरून आलं आणि सैल झालेली जन्मजन्मची गाठ पुन्हा एकदा बांधली गेली.

तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावांतील अमोल व संगीता (वर आणि वधूचे नाव बदलले आहे) दोघांचे लग्न ठरले. लग्नाच्या आदल्या दिवशी हळदी समारंभ थाटामाटात पार पडला. कोरोनामुळे मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न सोहळा संपन्न झाला. वर व वधूसह मानाची जेवण्याची पंगत सुरू झाली. मानपान व वटकण लावले गेले. मात्र वधू पक्षाकडून त्यावर समाधान न मानता वाढीव मागणी सुरू झाली. (The police brought the two couples together)

लग्न सोहळा
मी पस्तीस वर्षे हटत नसतो, आमदार लंकेंनी सांगितला राजयोग

अखेर मुलीच्या वडिलांनी विनंती केली मात्र वरपक्ष इरेला पेटला. शेवटी जेवणाचे ताटावरून वधू उठली. आनंदाचे वातावरण गंभीर झाले. वधूने सासरी जाण्यास नकार दिला. शेवटी वर पक्षाला वधू विना परतावे लागले होते. मात्र आज (ता. २३) पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलिस निरीक्षक सुरेश माने यांनी दोन्ही गावांतील प्रतिष्ठितांना एकत्र करीत मनोमिलन घडवून आणले. मोठ्या उत्साहात मुलीची सासरी पाठवणी करण्यात आली.

पुन्हा जुळले याचे समाधान

नवरदेवाच्या ताटाला वधूपक्षाकडून वटकण लावण्याची प्रथा समाजात रूढ आहे. मात्र, हौसेने करावयाची ही प्रथा विवाहबद्ध झालेल्या वधू-वरांच्या रेशिमगाठी तोडण्यास कारणीभूत ठरत असेल, तर ही बाब गंभीर आहे. दोन्ही कुटुंबे एकत्र आले आहेत. या कामी सहायक पोलिस निरीक्षक सुरेश माने यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

- चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक, कर्जत (The police brought the two couples together)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.