Ahmednagar : माझ्या जोडीला राहूल की राजेंद्र हे जनता ठरवेल; सुजय विखेंचे श्रीगोंद्यात सूचक विधान

Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe Patil
Updated on

श्रीगोंदे - श्रीगोंद्याचे राजकारण न समजण्यापलीकडचे आहे. दिवसाला बदलणाऱ्या राजकारणावर जर पिश्चर काढला तर आपणही कोटभर रुपये त्यासाठी खर्च करु हे विनोदाने सांगतानाच खासदार डाॅ. सुजय विखेपाटील यांनी विधानसभेची गुगली टाकली. मी (सुजय) आहेच त्यांच्यासोबत श्रीगोंद्यातून कोणता आर (राहूल जगताप की राजेंद्र नागवडे) द्यायचा हे जनता ठरवेल असे सांगत अप्रत्यक्षपणे विधानसभेचे राजकीय गणित खुले केले.

Sujay Vikhe Patil
Ashadhi Wari 2023 : वारकरी पोलिसांना तुडवत मंदिराच्या दिशेने..., आळंदीत लाठीचार्जसंदर्भात मोठी अपडेट

काष्टी येथे सोसायटीचे अध्यक्ष राकेश पाचपुते व व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष संजय काळे यांनी सुरु केलेल्या ‘एस आर’ सिनेमागृहाचे उदघाटन डाॅ. विखे यांनी केले. जेष्ठ नेते बाबासाहेब भोस, जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे, जेष्ठ नेते कैलासतात्या पाचपुते, दीपक नागवडे, अतुल लोखंडे, बाळासाहेब गिरमकर, चित्रपट दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे उपस्थितीत होते.

सिनेमागृहाच्या 'एसआर' या नावावर विश्लेषण करताना माजी आमदार राहूल जगताप यांनी, ते नाव सुजय व राहूल असे आहे हे सांगताच हशा पिकला. त्यानंतर राजेंद्र नागवडे यांनी तसे नव्हे तर सुजय व राजेंद्र असे आहे असे सांगताच टाळ्या पडल्या.

Sujay Vikhe Patil
Raj Thackeray : "ह्यावर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की,..."; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

अध्यक्षीय भाषणात विखे यांनी श्रीगोंद्याचे राजकारण शेलक्या शब्दात उलगडून दाखविले. टीडीएम या चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे तेथे बसले होते. त्यांच्याकडे पाहत विखे म्हणाले, भाऊसाहेब तुम्ही श्रीगोंद्याचे भुमिपुत्र आहात, येथील राजकारण देशात गाजत असताना तुम्हाला या राजकारणावर चित्रपट काढावा असे का वाटले नाही. तुम्ही पुढाकार घेणार असाल तर कोटीचा खर्च मी करतो आपण एकत्र पिश्चर काढू.

नेत्यांची वाढती संख्या, त्यांचा रोज बदलणारा पक्ष, गट-तट, चिन्ह हे सगळेच न समजण्यापलिकडचे आहे. हा चित्रपट जर काढला तर त्याचे दहा भाग करावे लागतील कारण येतील राजकारण एका भागात संपणारे नाही. आम्हालाच काय कुणालाच येथील राजकारण आणि नेते, कार्यकर्ते समजले नाहीत. त्यामुळे श्रीगोंद्याच्या राजकारणातील खलनायकाची भुमिका कुणाला द्यायची हेही ठरवावे लागेल असे सांगत श्रीगोंद्याच्या राजकारणाचा खरा पिश्चरच त्यांना लोकांसमोर मांडला.

एसआर नावावर विश्लेषण करीत खासदार विखे म्हणाले, या नावाबद्दल अनेकांनी मते मांडली त्यात सुजय म्हणजे मी सगळ्यांच्या तोंडी आहे यातच माझ्यावरचे प्रेम समजले. आता माझ्या जोडीला राहूल जगताप द्यायचे की राजेंद्र नागवडे हे जनता ठरवेल जो मिळेल त्याच्या सोबत मी आहेच असे सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजवित विखे यांना दाद दिली..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.