टाकळी ढोकेश्वर : टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथे वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या माध्यमातून 3 कोटी 76 लाख रुपयांची योजना मंजूर झाली आहे. मात्र, या योजनेचे काम ठेकेदाराकडून निकृष्ट होत आहे, असा आरोप करीत माजी सरपंच शिवाजी खिलारी, उपसभापती विलास झावरे, मोहन रांधवन, भाऊसाहेब खिलारी, दीपक साळवे यांनी पाइपलाइनचे काम बंद पाडले. (The villagers stopped the work of Takli water scheme)
35 वर्षांपूर्वीच्या पाइपलाइनला या नव्या पाणीयोजनेची वाहिनी जोडल्याने, या योजनेच्या निकृष्ट कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. या कामाची वरिष्ठांकडून चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. चार वर्षांपासून हे काम कासवगतीने सुरू आहे. ठेकेदार ग्रामपंचायतीच्या इतर पदाधिकाऱ्यांचे फोन स्वीकारत नसल्याची तक्रार गटविकास अधिकारी किशोर माने यांच्याकडे करण्यात आली. चार वर्षांपासून हे काम संथगतीने सुरू आहे. मात्र, आता अंतिम टप्प्यात काम असताना जुन्या पाइपलाइनला नवीन पाइपलाइन जोडण्याचा प्रताप ठेकेदारांनी केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पाणीपुरवठ्यास प्राधान्य आहे. कोणीही याचे राजकारण करू नये. पाइपलाइनचे काम उत्कृष्ट करणे आमचे कर्तव्य आहे. टॅंकरचा प्रस्तावही पंचायत समितीकडे पाठविला आहे.
- अरुणा खिलारी, सरपंच
(The villagers stopped the work of Takli water scheme)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.