आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

तीन पोलीस पथकांकडून आरोपीचा चौफेर शोध सुरु
maharashtra
maharashtrasakal
Updated on
Summary

आरोपी गावातून यापूर्वीच पसार असून तीन पोलीस पथकांकडून त्याचा चौफेर शोध सुरु आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : चितळी Chitli येथील अल्पवयीन मुलीच्या minor girl मृत्यूप्रकरणी case of death आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी येथील तालुका पोलिस ठाण्यात taluka police station आज एका तरुणावर youth गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी Accused गावातून यापूर्वीच पसार असून तीन पोलीस पथकांकडून त्याचा चौफेर शोध सुरु आहे.

maharashtra
मुलीचे अपहरण प्रकरण : आरोपीच्या अटकेसाठी श्रीरामपूर, बेलापुरात बंद

चितळी येथे आदिवासी समाजातील एका अल्पवयीन मुलीचा गुरुवारी (ता. १९) सायंकाळी ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. ते घर आरोपी आकाश राधू खरात याचे असून सदर मुलीच्या घरापासून ते हाकेच्या अंतरावर आहेत. घटनेनंतर गुरुवारी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र मुलीचे कुटुंबीय व नातेवाईक त्यावर समाधानी नव्हते. मृत्यूमागे घातपाताचा संशय त्यांनी व्यक्त करुन आरोपीचे नाव पोलिसांना सांगितले होते.

maharashtra
श्रीरामपूर ते थेट तामिळनाडू! 'तो' मुलगा अखेर सापडला

परंतू शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, त्यानंतरच गुन्हा दाखल केला जाईल असे पोलिसांनी सांगितले होते. अखेर शनिवारी दुपारी मयत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून येथील तालुका पोलिस ठाण्यात आकाश राधू खरात (वय २५) याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांनी दिली.

maharashtra
श्रीरामपूर तालुक्यात बाधितांचा आकडा हजारापार

गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासणी अहवालात नमुद केले. असून सखोल अहवालातून अनेक बाबी समोर येणार आहेत. आकाश हा मुलीकडे लग्नाची मागणी करीत होता, असे फिर्यादीत म्हटले असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. दरम्यान, शुक्रवारी नगर येथे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केले. त्यानंतर रात्री उशिरा चितळीमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले. तेव्हा तालुका पथक तैनात होते. घटनेपूर्वी मुलगी बेपत्ता झाली होती. त्यामुळे आरोपी आकाश खरात याच्या घरात तिचा मृतदेह सापडल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.