Ahmednagar : गावात विविध कंपन्यांचे मोबाईल टॉवर उभे; मात्र मोबाईलला रेंजच नाही

गावात विविध कंपन्यांचे मोबाईल टॉवर उभे मात्र रेंजच नसल्याने ‘टॉवर गावाला अन् रेंज नाही नावाला...’ अशी अवस्था चिचोंडी व परिसरातील मोबाईलधारकांची झाली आहे.
mobile tower
mobile towersakal
Updated on

-तुळशिदास मुखेकर

करंजी : गावात विविध कंपन्यांचे मोबाईल टॉवर उभे मात्र रेंजच नसल्याने ‘टॉवर गावाला अन् रेंज नाही नावाला...’ अशी अवस्था चिचोंडी व परिसरातील मोबाईलधारकांची झाली आहे.

याबाबत चिचोंडी, धारवाडी, डोगरवाडी, गितेवाडीसह सुमारे बारा गावांचे व्यवहाराचे केंद्र म्हणून चिचोंडी शिराळ गाव ओळखले जाते. अनेकांचे नातेवाईक पुण्या-मुबईला असतात. तर डोंगराळ भागात संपर्कासाठी मोबाईलला खूप महत्व आहे.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून मोबाइलचे अचानक नेटवर्क जाणे, फोन सुरू असताना अचानक कट होणे. फोर-जी सेवा असली तरी टू-जीची सेवा मिळणे, वापर कमी बिलच जास्त येणे, शेजारी-शेजारी फोन असताना फोन न लागणे अशा अनेक कारणांमुळे सर्वच मोबाइलधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.

यामध्ये बीएसएनल या सरकारी कंपनीचे नेटवर्कही अपवाद नाही. सध्याच्या काळात मोबाइलशिवाय जगणे कठीण बनले आहे. नागरिक त्यांच्या सोईनुसार विविध मोबाइल कंपन्यांची सीमकार्ड वापरतात.

मात्र, अलिकडे मोबाइल कंपन्यांच्या सदोष सेवेमुळे सर्वच कंपन्यांचे ग्राहक त्रस्त झाले आहेत. प्रत्येक मोबाइल कंपनीच्या ग्राहकाला विचारल्यानंतर काहींना काही तक्रार असल्याचे आढळून आले आहे.

परिसरातील अनेकांशी संपर्क साधल्यानंतर मोबाइल कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या सेवांचा नागरिकांनी पाढाच वाचून दाखविला. जिओ या कंपनीचे सीमकार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना सर्वाधिक त्रास होत असल्याचे आढळून आले. याचा सर्वाधिक फटका व्यावसायिकांना बसला आहे.

तक्रार कशी करायची?

मोबाईलला रेंज नसणे, इंटरनेटला स्पीड कमी असणे असे वारंवार प्रकार घडतात. त्यामुळे याची तक्रार नेमकी करायची कोठे? असा प्रश्न सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे तर अशा प्रकारची यंत्रणा नसल्याचे अनेक जण सांगतात.

गेल्या काही महिन्यांपासून रेंज जाण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे कामाच्या वेळात खूप त्रास होतो. त्यामुळे सोबत दुसऱ्या कंपनीचे एक कार्ड वापरतो. कधी-कधी फोन न लागणे, इंटरनेटला स्पीड कमी असणे किंवा मध्येच इंटरनेट बंद होणे, असे प्रकार वारंवार घडत आहेत.

-संतोष गरुड, संगणक चालक, चिचोंडी

मोबाईलवर पैसे लवकर ट्रान्सफर न होणे, इंटरनेट स्पीड कमी असणे. दुसऱ्या व्यक्तीला नंबर अस्तित्वात नसल्याचे सांगणे, असा त्रास सातत्याने होत असतो.

-अजिनाथ आव्हाड, व्यावसायिक

mobile tower
Ahmednagar Tour :पावसाळ्यात करा धबधब्यांची सफर; अहमदनगरमधील रंधा, भंडारदरा ही तर पर्यटकांची आवडती ठिकाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()