'नवरा निर्व्यसनी हवा गं बाई'! लग्नासाठी 'या' मुलांना मिळतेय पहिली पसंती

मला लगीन कराया पायजे.., निर्व्यसनी नवरा पाहिजे, शेतकरी नवरा नको गं बाई, सरकारी नोकरीला असला तर पहिली पसंदी, अशी भूमिका आदिवासी तरुणींनी मांडली. रा
'नवरा निर्व्यसनी हवा गं बाई'! लग्नासाठी 'या' मुलांना मिळतेय पहिली पसंती
Sakal
Updated on

Adivasi Lagn Melawa: मला लगीन कराया पायजे.., निर्व्यसनी नवरा पाहिजे, शेतकरी नवरा नको गं बाई, सरकारी नोकरीला असला तर पहिली पसंदी, अशी भूमिका आदिवासी तरुणींनी मांडली. राजूर येथे झालेल्या वधू-वर मेळावा संपन्न झाला. मेळावा यशस्वी झाल्याचे संयोजक मारुती लांघी यांनी सांगितले

अकोले तालुका आदिवासी समाज जाणीव जागृती आदिवासी कोळी महादेव मित्र मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित वधू-वर परिचय मेळावा राजूर येथील स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या प्रांगणात रविवारी (ता.२४) सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी गट शिक्षणाधिकारी मारुती लांघी, हरिभाऊ अस्वले, सोमनाथ सुकटे, माजी सभापती दत्ता देशमुख, माधव गभाले, संतोष कचरे, जगन्नाथ सावळे, मुरलीधर भांगरे, संस्थेचे सचिव बापू काळे, प्राचार्य मंजुषा काळे, पांडुरंग भांगरे, भीमा नाडेकर, अविनाश बनसोडे उपस्थित होते.

दत्ता देशमुख म्हणाले, की वधू वर परिचय मेळावा काळाची गरज आहे. सामुदायिक विवाह पुन्हा सुरू होणे आवश्यक आहे. माधव गभाले म्हणाले, की यावर्षी २२५ नोंदणी झाली. पुढील वर्षी हा आकडा ५०० च्यावर जाईल, असा विश्‍वास व्यक्त केला.

काशिनाथ साबळे म्हणाले, की आदिवासी भागात शेतकरी मुलांना व कमी शिक्षण झालेल्या मुलांचे आज ३२ वर्षे वय होऊनही लग्न होत नसल्याचे खंत व्यक्त करून प्रत्येक गावात प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. आभार श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य मंजुषा काळे यांनी मानले. मेळाव्यात पदवीधर मुलींची संख्या व कमी शिकलेल्या शेतकरी मुलांची संख्या अधिक होती. (Latest Marathi News)

२५ विवाह निश्‍चित

मेळाव्यात २२५ मुलामुलींनी आपला परिचय करून दिला. त्यामधून २५ विवाह निश्‍चित झाले. १०० वधूवरांनी एकमेकांशी संवाद साधला.

'नवरा निर्व्यसनी हवा गं बाई'! लग्नासाठी 'या' मुलांना मिळतेय पहिली पसंती
Purna-Parli Passenger Train: नांदेडजवळ पूर्णा-परळी पॅसेंजर ट्रेनला भीषण आग; चौकशी सुरू...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.