Samriddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघात; श्रीरामपूरच्या दोघांचा मृत्यू

सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात बुधवारी मध्यरात्री झाला अपघात
Samriddhi Highway
Samriddhi Highwaysakal
Updated on

श्रीरामपूर - समृद्धी महामार्गावर इगतपुरी ते शिर्डी टप्प्यात सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास स्विफ्ट कारचा अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू झाला. हे दोघे जण श्रीरामपूर तालुक्यातील रहिवासी आहेत.

Samriddhi Highway
Samriddhi Highway : दुभाजकाला कार धडकून चार भावांचा दुर्दैवी अंत; अंत्यविधीला गेलेल्यांवर काळाचा घाला

श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेले आरोग्य कर्मचारी श्रीकांत दत्तात्रय थोरात (वय ३८, रा. अपूर्वा कॉम्प्लेक्स, संजीवन हॉस्पिटलजवळ, श्रीरामपूर) हे चालक हर्षद शिवाजी भोसले (वय ३७, रा. शिरसगाव, ता. श्रीरामपूर) यांच्यासोबत स्विफ्ट डिझायर कारमधून (एमएच १४ ईवाय ७१९८) इगतपुरी येथील भरवीर इंटरचेंजवरून समृद्धी महामार्गाने शिर्डीच्या दिशेने जात होते. गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास कार अपघातग्रस्त झाली.

तीन ते चार वेळा उलटून कार दुभाजकाच्या साइड बॅरिकेड्सना धडकून दोन्ही लेनच्या मधोमध जाऊन पडली. किलोमीटर क्रमांक ५६० वर हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळाल्यावर गोंदे इंटरचेंज येथील महामार्ग सुरक्षा पथकाचे मदत पथक तातडीने अपघातस्थळी रवाना झाले.

Samriddhi Highway
Samriddhi Highway : रिक्षा अन्‌ दुचाकींना ‘समृद्धी’वर प्रतिबंध

अपघाताची माहिती समजल्यावर वावी पोलिस ठाण्यातील कर्मचारी शैलेश शेलार, देविदास माळी हेदेखील अपघातस्थळी पोचले. कारमधील दोघा जखमींना बाहेर काढत टोल नाक्यावरील रुग्णवाहिकेतून सिन्नर ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तेथे पोचण्यापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.थोरात यांनी कोविड काळात अहोरात्र काम केले. लसीकरण मोहिमेवेळी त्यांचा हजारो नागरिकांशी संपर्क आला. यावेळी केलेल्या कार्यामुळे त्यांचा अनेकांशी स्नेह निर्माण झाला होता.

Samriddhi Highway
Sukanya Samriddhi Account Scheme : पुणे जिल्ह्यातील २१ हजार मुलींनी उघडले सुकन्या समृद्धी खाते

वाहनात रोकड सापडली

दरम्यान, पोलिसांना अपघातग्रस्त कारमध्ये एक लाख ६० हजार रुपये आढळून आले. ही रक्कम ताब्यात घेतल्याचे वावी पोलिस ठाण्यातील कर्मचारी शैलेश शेलार यांनी सांगितले. ही रक्कम थोरात की भोसले यांची होती, याबाबत खातरजमा करून घेतल्यावर ती संबंधितांच्या नातेवाइकांकडे देण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.