सिद्धटेक (जि. अहमदनगर) : लाखो हेक्टर शेतीसाठी संजीवनी असलेले 'उजनी' धरण (Ujani Dam) सध्या पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहे. भीमानदी पाणलोटक्षेत्रातील सर्व धरणे 'फुल्ल' झाली आणि त्यातून उजनी धरणात विसर्गही सुरू झाला. परंतु, उजनी धरण परिसरात पुरेसा पाऊस झाला नसल्याने सध्याच्या पाणीसाठ्याच्या ६० ते ८२ टक्क्यांदरम्यानच्या या रेंगाळलेल्या प्रवासाने मात्र शेतकरीवर्गाला श्वास रोखून धरायला भाग पाडले आहे.
पावसाच्या उघडीपमुळे धरण भरण्याबाबत प्रश्नचिन्ह
अनेक दिवसांपासून उजनी धरणात नवीन पाण्याची आवक पूर्णपणे थांबली होती. त्यातच पाऊसही थांबल्याने धरणातील पाण्याचा उपसा वाढला होता. त्यामुळे धरणातील पाणी पातळी पुन्हा रोडावेल, अशीच काहीशी परिस्थिती होती. परंतु, पुन्हा एकदा भीमा पाणलोटक्षेत्रातील संततधार पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरली. खडकवासला, पवना, कासारसाई, चासकमान, आंद्रा, वरसगाव, कलमोडी, पानशेत या धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु झाल्याने उजनी धरणातील पाणीसाठा ६२ टक्क्यांवरून ८२ टक्क्यांवर पोचला आहे. आता पुन्हा एकदा पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे धरण भरण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, मागील वर्षी याच दिवशी उजनी धरण ११० टक्के म्हणजेच पूर्ण क्षमतेने भरले होते.
''उजनी धरणातील पाणीसाठा ८२ टक्क्यांवर पोचला असून अजूनही पाण्याची आवक सुरूच आहे. त्याचप्रमाणे खात्रीशीर येणाऱ्या परतीच्या मान्सूनच्या पावसामुळे उशीरा का होईना, धरण नक्कीच भरणार आहे.'' - धीरज साळे, कार्यकारी अभियंता, उजनी धरण व्यवस्थापन
भीमापाणलोटातील धरणे
(साठवणक्षमता/आजची टक्केवारी)
खडकवासला- १.९३/९८
पवना-८.५१/१००
कासारसाई-०.५७/१००
कलमोडी-१.५१/१००
चासकमान-७.५८/१००
आंद्रा-२.९२/१००
वरसगाव-१२.८२/१००
पानशेत-१०.६५/१००
भामा-आसखेड-७.६७/१००
टेमघर-३.७१/१००
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.