Ahmednagar News : अनधिकृत मालमत्ता मनपाच्या रडारवर, आठ हजार घरांचे मोजमाप पूर्ण; बोगस नळजोडही उघड

दिल्ली येथील मॅप माय इंडिया या कंपनीला काम देण्यात आले आहे. शहरात नव्या इमारती उभ्या रहात आहेत.
unauthorized properties on municipal radar bogus tap connections exposed
unauthorized properties on municipal radar bogus tap connections exposedsakal
Updated on

- अरुण नवथर

अहमदनगर : उत्पन्न वाढीसाठी महापालिकेने शहरातील मालमत्तांच्या मोजणीचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत शहर आणि सावेडी विभागातील आठ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यात अनेक बोगस मालमत्ता महानगरपालिकेच्या रडारवर आल्या आहेत.

शहरातील सुमारे एक लाख ३१ हजार इमारती, घरे, भूखंडांचे जीआयएस मॅपिंगद्वारे मोजमाप करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दिल्ली येथील मॅप माय इंडिया या कंपनीला काम देण्यात आले आहे. शहरात नव्या इमारती उभ्या रहात आहेत.

परंतु हजारो मालमत्तांची आजही महापालिकेच्या दप्तरी नोंद नाही, तसेच बहुतांश मालमत्तांचा वापर व्यवसायासाठी सुरू आहे. परंतु त्यांची नोंद मात्र घरगुती वापर अशी करण्यात आलेली आहे.

त्यात या मालमत्तांना जुन्‍याच पद्धतीने कर लावला जातो. त्यामुळे महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा कर बुडत आहे. त्यामुळे कर आकारणीचे फेर मूल्यांकन करणे, तसेच बोगस मालमत्तांचा शोध घेण्याच्या उद्देशाने शहरातील सर्व मालमत्तांचे मोजमाप करण्यात येत आहे.

unauthorized properties on municipal radar bogus tap connections exposed
Ahmednagar : अहमदनगर ‘झेडपी’त गुरुजींच्या बदल्यांचाही खेळ

इमारती, घरे, मोकळ्या जागा, ओढे-नाले, तसेच इतर मालमत्तांचे जीआयएस मॅपिंगद्वारे सर्वेक्षण करून त्या माहितीचे संगणकीकरण करण्यात येत आहे. त्यानंतर या सर्वेक्षणानुसारच कर आकारण्यात येणार आहे. घरगुती, व्यावसायिक मालमत्ता, बोगस मालमत्ता, तसेच अधिकृत नळजोड असलेल्या मालमत्तांची स्वतंत्र नोंद या सर्वेक्षणाद्वारे करण्यात येत आहे.

सुधारित कर आकारणी

शहरातील सर्व मालमत्तांचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. जीआयएस मॅपिंगद्वारे घेण्यात आलेले मालमत्तांचे मोजमाप, बांधकामाचे नकाशे, बांधकामाचे छायाचित्र, अशी सर्व माहिती नव्याने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये संकलित केली जाणार आहे. ही सर्व माहिती एकत्रित करून सुधारित पद्धतीने कर आकारणी होणार आहे.

unauthorized properties on municipal radar bogus tap connections exposed
Ahmednagar : राहाता तालुक्यात पिंपळस येथे मध्यरात्री बिबट्याचा थरार; उडी फसली अन् जबड्यातील शिकार निसटली

बोगस नळजोड उघड

शहरातील मालमत्तांसह नळजोडांचेही सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यामुळे बोगस नळजोड घेणारेही महापालिकेच्या रडारवर येत आहेत. मालमत्ताधारकाचे नाव, त्याच्याकडे असलेला नळजोड, त्याची येणारी पाणीपट्टी अशी सर्व माहिती संकलित केली जात आहे.

भोडकरूंची लपवालपवी

खासगी कंपनीचे ६० ते ७० कर्मचारी घरोघरी जाऊन मालमत्तांची मोजणी करत आहेत. अनेक नागरिक या कर्मचाऱ्यांना घरात प्रवेश करू देत नाहीत, तर काहीजण जास्तीची (व्यावसायिक) कर आकारणी टाळण्यासाठी आपल्या घरातील भाडेकरूंची लपवालपवी करत आहेत. त्यामुळे सर्वेक्षणात अडचणी येत असल्याचे खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.