Ahmednagar Crime : अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरण : कर्जाची रक्कम अध्यक्ष-अधिकाऱ्यांना वैकर याची पोलिसांकडे कबुली

बँकेत २९१ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याप्रकरणी बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
urban bank scam loan fund to president and other officers victim statement
urban bank scam loan fund to president and other officers victim statementSakal
Updated on

अहमदनगर : अर्बन बँकेतून मंजूर कर्ज रकमेतून २० लाख रुपये बँकेतील तत्कालीन अध्यक्ष दिलीप मनसुखलाल गांधी यांना रोख स्वरूपात दिले व १० लाख रुपये बँकेचा अधिकारी संशयित आरोपी घनश्याम ऊर्फ हेमंत अच्युत बल्लाळ याला दिले असल्याची कबुली एव्हीआय इंजिनिअरिंग कंपनीचा संचालक अविनाश प्रभाकर वैकर (वय ६३, रा. सोनानगर चौक, सावेडी, नगर) याने पोलिस तपासात दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

बँकेत २९१ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याप्रकरणी बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

फॉरेन्सिक ऑडिटनुसार गैरव्यवहाराची तपासणी करून कारवाई केली जात आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी (ता. ४) पहाटे कर्जदार वैकर याला अटक केली होती. न्यायालयाने त्याला ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्याला काल पुन्हा न्यायालयासमोर हजर केले होते.

वैकर याने एव्हीआय इंजिनिअरिंग वर्क्सच्या नावे व्यवसायाकरिता माल खरेदी-विक्री, तसेच व्यवसायासाठी खेळते भांडवल म्हणून वेळोवेळी दोन कोटी ६७ लाख रुपये कर्ज घेतले. यातील काही रक्कम दुसऱ्या बँकेचे कर्ज फेडण्यासाठी, काही रक्कम स्वत:च्या नावे मुदत ठेवीमध्ये गुंतवणुकीसाठी, काही रक्कम वैयक्तिक खरेदीसाठी व काही रक्कम रोख स्वरूपात काढून कर्ज रकमेचा गैरवापर केला आहे.

त्याने मंजूर कर्ज रकमेतून २० लाख रुपये हे रोख काढून ते दिलीप गांधी यांना दिले असल्याची कबुली दिली. वैकर याला कर्ज देते वेळी त्याची कर्ज परत फेडण्याची क्षमता न तपासता कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी बँकेचा अधिकारी संशयित आरोपी घनश्याम ऊर्फ हेमंत अच्युत बल्लाळ याने मदत केली.

त्या बदल्यात बल्लाळ यास नगर अर्बन बँकेच्या मंजूर हौसिंग लोन रकमेतून सहा लाख रुपये हे त्याच्या बँक खात्यावर वर्ग केल्याचे व चार लाख रुपये रोख, असे १० लाख रुपये दिले, असे वैकरने कबुली जबाबात म्हटले.

तपासाला गती

पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेचा पदभार आल्यानंतर गुन्ह्याच्या तपासाला गती आली होती. त्यांनी आरोपींच्या विरोधात अटकसत्र राबविले. मिटके यांची नाशिकला बदली झाली. शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेचा अतिरिक्त पदभार आला. त्यांनी ही आरोपींच्या विरोधात अटकसत्र राबविले. उपनिरीक्षक निसार शेख, महिला उपनिरीक्षक मोरे यांच्या पथकाने कर्जदार अविनाश वैकर याला अटक केल्याने कर्ज प्रकरणे मंजुरीतील टक्केवारी उघडकीस आली आहे.

वैकरला न्यायालयीन कोठडी

या गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी आणखी पाच दिवसांची कोठडीची मागणी सरकारी वकील मंगेश दिवाणे यांनी केली. न्यायालयाने वैकर याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.