नेवासे : केवळ जिज्ञासेपोटी अमली पदार्थांची चव चाखणारे पुढे या गर्तेत आपसुकच सापडतात. सुरवातीला कोणीही व्यसनाधीन होण्यासाठी या पदार्थांचे सेवन करत नाही. मात्र, हळूहळू हे सेवन वाढते तेव्हा ते कधी त्यात अडकतात, हे त्यांनाच कळत नाही. क्षणिक सुखासाठी तरुणाई व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याचे चित्र आहे. या विळख्यातून तरुणाईला बाहेर काढणे कठीण असून, यासाठी व्यापक जनजागृतीची गरज आहे.
दर वर्षी २६ जूनला जगभरात अमली पदार्थ सेवनविरोधी दिन पाळण्यात येतो. अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागृती करण्यासाठी या दिवसाचे महत्त्व आहे. जिल्ह्यात सहज मिळणारा गांजा ते खोकल्याचे सिरप, झोपेच्या गोळ्या, व्हाइटनरच्या विळख्यात बहुतांश तरुणाई अडकली आहे. बदललेली जीवनशैलीही यास जबाबदार आहे. यात आई-वडील नोकरीनिमित्त घराबाहेर, तर मुले मोबाईलमध्ये गुंतून राहत असल्याने, त्यांच्याशी संवाद दुर्मिळ होत चालला आहे.
आपली मुले काय करतात, ते कोणाच्या संगतीत आहेत, याची बहुतांश पालकांना कल्पनाच नसते. त्यांचे मुलांना केवळ ‘पॉकेटमनी’ पुरविण्याएवढेच लक्ष असते. अशी मुले व्यसनांकडे वळण्याची शक्यता वाढते. यात सहज मिळणारे अमली पदार्थ त्यांना व्यसनात ओढण्यास मदत करत असल्याचे चित्र आहे.
राज्य शासनाने गुटखा, खर्रा यांच्या विक्रीवर बंदी घातली असली, तरी त्याची खुलेआम विक्री सुरू असल्याचे दिसते. त्यामुळेही तरुणाई व्यसनाधिनतेकडे वळत असल्याचे चित्र आहे.
अमली पदार्थांची विक्री आणि त्यावर प्रतिबंध आणण्यासाठी शासन सर्व स्तरांवर प्रयत्न करते. अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे वेळोवेळी कारवाई करण्यात येते. तरुणांनी अमली पदार्थांपासून दूर राहावे.
- संजय शिंदे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, नगर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.