टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्तरीत्या तालुक्यातील नागापुरवाडीच्या डुबेवाडी येथील अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यां विरोधात बुधवारी उशिरा केलेल्या कारवाईत सुमारे 70 ते 80 ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला.
एक पोकलेन मशीन व दोन ट्रॅक्टरही जप्त करण्यात आले. यात एकूण 40 ते 50 लाखांचा अवैध वाळूसाठा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे वाळुतस्करांचे धाबे दणाणले आहेत.
तालुक्यातील नागापुरवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उत्खनन व उपसा केला जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यावेळी डूबेवाडी येथे अवैधरित्या पोकलेन मशिनच्या साह्याने वाळू काढली जात होती. कारवाईमध्ये पोकलेन मशीन तसेच दोन ट्रॅक्टर जप्त केले. हे सर्व वाहने वैभव बाळकृष्ण पायमोडे
(रा.टाकळी ढोकेश्वर) याचे असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.
तहसीलदार ज्योती देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक घनश्याम बळप व एम.ए.नायब तहसीलदार माळवे यांनी ही कारवाई केली. संबंधित वाहने पंचनामा करून पारनेर पोलिस ठाण्यात आणून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पथकामध्ये पोलिस निरीक्षक घनश्याम बळप, नायब तहसीलदार एम.ए.माळवे, सलगरे कामगार तलाठी शिरसाठ, एरंडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल भालचंद्र दिवटे, सत्यम शिंदे आदींचा समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.