पारनेर - एकाच घरात खासदार व आमदार निवडून दिले तर तुम्हाला कोणीच वाली राहणार नाही. मी तुम्हाला जागे करण्यासाठी आलोय. मतदारांनी जागे व्हा. विधानसभेसाठी एकच जागा आहे, मात्र अनेकजण इच्छुक आहेत. कदाचित मी घेतलेला निर्णय आवडणार नाही, तरीसुद्धा एकत्र या, अन्यथा समोरच्यांचे फावले जाईल. त्याचे परिणाम पुढील पाच वर्षे भोगावे लागतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.