'संगमनेरचा सहकार थोरातांमुळे दिशादर्शक' - डॉ. विश्‍वजित कदम

Vishwajeet Kadam's speaks about Sangamner co-operative sector
Vishwajeet Kadam's speaks about Sangamner co-operative sectorSakal
Updated on

संगमनेर (जि. अहमदनगर) : दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळे ग्रामीण भागाचा विकास कसा होतो, याचे उदाहरण दुष्काळी ते प्रगतिशील संगमनेर तालुक्याकडे पाहताना दिसते. येथील सहकाराचा पॅटर्न देशासाठी आदर्शवत ठरल्याचे गौरवोद्‍गार सहकार राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांनी काढले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या या गळीत हंगामातील पहिल्या अकरा हजार एकशे अकरा पोत्यांच्या पूजनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, की ग्रामीण विकासात सहकाराचा मोठा वाटा असून, त्यात संगमनेर तालुका अग्रगण्य आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सक्षम नेतृत्वामुळे सहकारातून ही किमया झाली असून, या सहकारी संस्था कुटुंबांशी जोडल्या गेल्या आहेत. येथील साडेपाच हजार टन क्षमतेचा नवीन कारखाना व ३० मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्प राज्यातील इतर कारखान्यांसाठी मार्गदर्शक ठरला आहे. राजहंस दूध संघाच्या उत्पादनांची परराज्यांत होत असलेली विक्री महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे.

Vishwajeet Kadam's speaks about Sangamner co-operative sector
'मंत्रिपदाच्या शर्यतीत मी कधी नव्हतेच' - खासदार प्रीतम मुंडे

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, की ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने सहकाराने समृद्धी निर्माण केली आहे. मागील पिढीने सहकाराचा पाया घातला, तर थोरात यांच्यासारख्या कर्तबगार नेतृत्वाने त्यावर विकासाचा कळस चढवला. ही चळवळ अधिक सक्षम केल्यास महाराष्ट्र समृद्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, यशोधन कार्यालयाचे प्रमुख इंद्रजित थोरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींसह कारखान्याचे संचालक उपस्थित होते.

मंत्रिद्वयाने केली विविध संस्थांची पाहणी

राज्य मंत्रिमंडळातील तरुण मंत्रिद्वयाने अमृत उद्योगसमूहातील थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, अमृतवाहिनी बँक, कॉलेज, सह्याद्री शिक्षण संस्था, शॅम्प्रो, डेंटल कॉलेज आदी संस्थांना भेटी दिल्या.

Vishwajeet Kadam's speaks about Sangamner co-operative sector
'आदळआपट अन् दबंगगीरीशीवाय महिलांची कामे होत नाहीत' - पंकजा मुंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.