पाथर्डी : येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित उपचार घेत असताना तेथे विनापरवाना जाऊन रुग्णांच्या बेडवर बसून त्यांच्या व स्वत्ःच्या जीवाला धोका निर्माण करण्याचे काम माजी नगरसेवक चाँद हुमायुन मणियार यांनी केले.
पोलिसांनी मणियार यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे. या बाबत पोलिस कर्मचारी अतुल शेळके यांनी पोलिसात फिर्याद नोदंविली आहे. माजी नगरसेवक चाँद मणियार हे उपजिल्हा रुग्णालयात १९ जुलै २०२० रोजी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गेले.
हेही वाचा - प्रशासकामुळे अण्णा हजारे आले अटीतटीवर
तेथे कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरु असताना त्यांच्या बेडवर जाऊन बसले. तसेच स्वतःच्या रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होईल असे कृत्य केले. म्हणून त्यांच्याविरुद्ध जिल्हाकारी यांच्या कोविड संदर्भातील आदेशाचे उल्लघन केले. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.
शहरात कोविडची परिस्थिती गंभीर असताना लोक काळजी घेत नाहीत. नाईलाजाने पोलिसांना कायदेशीर कारवाई करावी लागत आहे. तहसीलदार नामदेव पाटील यांनी पोलिसांना सुचना देवुन कोणीही असो नियम मोडले की कडक करावाई झालीच पाहीजे असा आग्रह धरला आहे.
माणुसकीची भावना बाजुला ठेवा आणि कोरोनावर मात करण्यासाठी नियमांची कडक अमंलबजावणी करा असे पाटील यांनी सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.