संगमनेर : संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब थोरात हे १९८५ पासून नेतृत्व करत आहेत. आजपर्यंत त्यांना एकहाती सत्ता राखण्यात यश आले आहे. मात्र, यावेळेस महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे आताची होणारी विधानसभेची निवडणूक ही रंगतदार होण्याचे संकेत मिळत आहे.