कोपरगाव ः ‘‘शंभर खाटांच्या नियोजित उपजिल्हा रुग्णालयास आपल्या पाठपुराव्यामुळे विशेष बाब म्हणून मान्यता मिळाली, असा स्पष्ट उल्लेख मंजुरीपत्रात आहे. आमच्या विरोधकांना यापेक्षा आणखी कुठला पुरावा हवा? केवळ पत्र पाठवून कामे होत नाहीत. त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो,’’ अशा शब्दांत आपली भूमिका स्पष्ट करीत, आमदार आशुतोष काळे यांनी आज या वादात पुराव्यादाखल सरकारी पत्रव्यवहार पत्रकारांसमोर ठेवला. (Works are not done just by showing the letter)
ग्रामीण रुग्णालय परिसरात बांधण्यात येणाऱ्या पन्नास ऑक्सिजन कोविड बेड वॉर्डचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यानिमित्ताने त्यांनी नियोजित उपजिल्हा रुग्णालयाच्या मंजुरीवरून सुरू असलेल्या श्रेयवादाच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका पत्रकारांसमोर मांडली.
या प्रसंगी नगराध्यक्ष विजय वहाडणे, तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, डॉ. संतोष विधाते, डॉ. वैशाली बडदे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरम बागरेचा, जिनिंग- प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके आदी उपस्थित होते.
काळे म्हणाले, ‘‘आरोग्य मंत्रालयाने आपल्या पाठपुराव्यामुळे ही मंजुरी दिल्याचे पत्रात नमूद केले. ग्रामीण रुग्णालय परिसरात ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय ही मतदारसंघाच्या दृष्टीने फार मोठी व महत्त्वाची वैद्यकीय सुविधा असेल.’’
नगराध्यक्ष वहाडणे म्हणाले, ‘‘शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी काळे यांनी पाच क्रमांकाच्या साठवण तलावाचे काम सुरू केले. श्रेयवादाच्या लढाईत विकासकामे रेंगाळू नयेत.’’
कोविड संकटात मतदारसंघात तत्पर वैद्यकीय सुविधा देण्यास प्राधान्य दिले. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी या कामाची दखल घेतली. आपल्या राजकीय आयुष्यातील हा सुखद क्षण होता. जनतेसाठी वैद्यकीय सुविधा उभ्या करता आल्या, याचे समाधान वाटते.
- आमदार आशुतोष काळे
(Works are not done just by showing the letter)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.